• Download App
    Maharashtra Nagar Parishad Nagar Palika महायुतीत भाजपची कुरघोडी, पण शिंदे - अजितदादांच्या पक्षांनीही मारली बाजी!!

    महायुतीत भाजपची कुरघोडी, पण शिंदे – अजितदादांच्या पक्षांनीही मारली बाजी!!

    Shinde and Ajit Pawar

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : महाराष्ट्रातल्या नगरपंचायती नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये भाजपने इतर पक्षांवर कुरघोडी केली, तरी काही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाने भाजपच्या उमेदवारांचा पराभव केल्याचे चित्र दिसून आले. Shinde and Ajit Pawar

    मुखेड शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक बालाजी खतगावकर यांना राजकारणात पहिले यश आले आहे. एकनाथ शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले. एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक बालाजी खतगावकर यांना राजकारणात पहिले यश मिळाले.

    आटपाडी नगरपंचायतमध्ये भाजपा सहा जागांवर विजयी झाले आहे, तर शिवसेना शिंदे गट सात जागांवर विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस एका जागेवर विजयी झाले आहेत, भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यु. टी. जाधव विजयी झाले.

    राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने औसा नगरपरिषदेवर ताबा मिळवला आहे. 23 जागे पैकी 17 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा विजय मिळवला आहे. 6 जागेवर भाजपाचा विजय झाला आहे, काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही, गेल्या वेळेस दोन वरून यावेळी काँग्रेस शून्यावर आली आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार परवीन नवाबुद्दीन शेख 450 मतांनी विजयी झाल्या.

    – मुरगुड मध्ये हसन मुश्रीफांना धक्का

    कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड नगरपरिषदेवर शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. शिवसेना शिंदे गटाचे 16 नगरसेवक विजयी झाले, तर सेनेच्या नगराध्यक्ष पदी सुहासिनी देवी प्रवीणसिंह पाटील विजयी झाल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 4 जागांवर विजय मिळाला आहे. हसन मुश्रीफ समरजित घाटगे यांना मुरगुडमध्ये धक्का बसला.

    विटा नगरपरिषदेत शिवसेना शिंदे पक्षाचे १७ उमेदवार आघाडीवर आहेत, तर भाजपचे आठ उमेदवार आघाडीवर आले.

    – कराड मध्ये पृथ्वीराज चव्हाणांना धक्का

    कराडमध्ये भाजपा आणि काँग्रेसला धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव 2000 मतांनी आघाडीवर आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.अतुल भोसले यांचे उमेदवार पिछाडीवर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराडमध्ये सभा घेतली होती.

    मोहोळ नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत. भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात झालेल्या चूरशीच्या सामन्यात शिंदे गटाने बाजी मारली आहे.

    माजी आमदार संजय जगताप यांची सत्ता जेजुरीमध्ये खालसा करण्यात अजित पवारांना यश मिळालं आहे. जेजुरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला घवघवीत यश मिळाले. नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदीप बारभाई विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 17 उमेदवार तर भाजपाचे 2 आणि अपक्ष 1 उमेदवार विजयी झाले आहेत.

    शिरूर नगरपरिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऐश्वर्या पाचर्णे विजयी झाल्या आहेत. भाजपसह महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला. भाजप – 11, राष्ट्रवादी AP – 5, महाविकास आघाडी-7, अपक्ष- 1

    – मालवण मध्ये शिंदे सेना विजयी

    मालवण नगर परिषदेत मंत्री नितेश राणेंना धक्का बसला आहे. शिवसेना आमदार निलेश राणे यांनी मुसंडी मारली आहे. नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या ममता वराडकर विजयी झाल्या आहेत. मालवण नगरपरिषदेवर शिंदेंच्या शिवसेनेने मुसंडी मारली आहे. शिवसेनेच्या १० जागा विजयी तर भाजपला फक्त ५ जागा मिळाल्या आहेत. मंत्री नितेश राणे यांना मालवण नगर परिषदेत धक्का बसला आहे. निलेश राणे यांनी मुसंडी मारली आहे.

    – रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे सेना + भाजप विजयी

    रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीवर महायुतीचा दबदबा निर्माण झाला. रत्नागिरी, चिपळूण, खेड नगरपरिषदेवर शिवसेनेचा (शिंदे सेना) झेंडा फडकला आहे. देवरूख आणि गुहागर नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. राजापूर नगरपरिषदेत काँग्रेसच्या माजी आमदार हुस्नबानू खलिपे विजयी झाले आहेत. लांजा नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकला. रत्नागिरी शिवसेनेनी आपला गड राखला.

    Maharashtra Nagar Parishad Nagar Palika results

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    दिल्लीतून “राजकारण” साधू पाहणाऱ्या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना गल्लीत मतदारांचा जोरदार धक्का!!

    ठाकरे + पवारांनी कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला सोडले वाऱ्यावर; आले सात आणि आठ वर; महाराष्ट्रातल्या गावांनी ठाकरे आणि पवार ब्रँडची लावली वाट!!

    Chhagan Bhujbal : ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा दावा- शरद पवारांनीच भुजबळांना तुरुंगात पाठवले; धनंजय मुंडेंनाही पाठवण्याची होती इच्छा