विशेष प्रतिनिधी
रायगड : शेतकऱ्याला पिस्तुल दाखवून धमकावणे, घरासमोर पोलिसांवर दादागिरी करणे, आत टाकण्याची धमकी देणे, पण कायद्याचा बडगा दिसताच घरातून पळून जाणे आणि त्यापाठोपाठ इंदुमती ढाकणे अशी फेक आयडेंटिटी बनवून रायगडाच्या पायथ्याच्या हॉटेलात राहणे अशा एकापाठोपाठ एक अडचणींच्या जाळ्यात मनोरमा खेडकर आता अडकल्या. मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांनी रायगडच्या महाडमधून बेड्या ठोकल्या. महाडच्या एका हॉटेलमध्ये त्या इंदुमती ढाकणे या बोगस ओळखपत्राच्या आधारे राहत होत्या. मनोरमा खेडकर यांच्या अटकेमुळे खेडकर कुटुंबाच्या अडचणी वाढल्या आहेत. Maharashtra | Manorama Khedkar, who was detained from Mahad, brought to Pune
मनोरमा खेडकर महाडमधील हॉटेलात लपल्या होत्या. या हॉटेलात त्या एका व्यक्तीसोबत थांबल्या होत्या. त्या व्यक्तीची ओळख मनोरमा यांनी आपला मुलगा अशी सांगितली होती. मनोरमा यांनी त्यांचं नाव इंदुबाई ढाकणे सांगितलं होतं, अशी माहिती हॉटेलचे मालक अनंत यांनी दिली. गुरुवारी पहाटे 3.30 वाजता पोलिसांचं पथक हॉटेलमध्ये पोहोचले. त्यांच्या पथकात महिला पोलिसही होत्या. सकाळी 6.30 वाजता पोलिसांचं पथक इथून निघून गेलं. पोलीस मनोरमाला सोबत घेऊन गेले,’ असं अनंत यांनी सांगितलं.
पिस्तुल दाखवत शेतकऱ्यांना धमकावणाऱ्या मनोरमा यांचा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर मनोरमा यांचाच पोलिसांवर दादागिरी करत असल्याचा दुसरा व्हिडिओ पण व्हायरल झाला. त्यानंतर मनोरमा यांच्या अटकेसाठी पोलिसांवर दबाव वाढला. अटकेच्या भीतीनं मनोरमा गायब झाल्या. पोलीस त्यांच्या घरी पोहोचले. पण त्या तिथे नव्हत्या. त्या सातत्यानं पोलिसांना गुंगारा देत होत्या. त्यांचा फोनही बंद होता. पूजा खेडकर यांच्या कुटुंबाला शोधण्यासाठी पोलिसांनी सर्च ऑपरेशन हाती घेतलं होतं.
मनोरमा खेडकर जमिनीच्या वादामुळे अडचणीत आल्या आहेत. पिस्तुल दाखवून शेतकऱ्यांना धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं मनोरमा यांच्या समस्या वाढल्या. व्हायरल व्हिडीओमध्ये त्यांच्या हातात पिस्तुल दिसत होतं. यानंतर पोलिसांनी मनोरमा, त्यांचे पती दिलीप खेडकर यांच्यासह 7 जणांविरोधात एफआयआर दाखल केला.
पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांचाही पाय खोलात सापडला आहे. माजी सनदी अधिकारी असलेल्या खेडकरांच्या नावे उत्पन्नाहून अधिक संपत्ती आहे. त्या संदर्भातले पुरावे एँटी करप्शन ब्युरोला मिळाले आहेत. 2020 मध्ये खेडकर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डातून संचालक पदावरुन निवृत्त झाले. त्यांनी यंदा वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढवली. नगर लोकसभा मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यावेळी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी आपली संपत्ती 40 कोटी सांगितली होती.
Maharashtra | Manorama Khedkar, who was detained from Mahad, brought to Pune
महत्वाच्या बातम्या
- ट्रम्प यांच्या समर्थनासाठी पुढे आले भारतवंशी रामास्वामी- निक्की हेली; ते राष्ट्राध्यक्ष असताना पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला केला नव्हता!
- श्रीलंका अंडर-19 क्रिकेटच्या माजी कर्णधाराची हत्या; घरात घुसून झाडली गोळी
- पवारांच्या भरवशावर उभा राहिलेले शेकापचे उमेदवार पडल्यामुळे काँग्रेस 7 आमदारांवर “कठोर” कारवाई करेल का??
- अग्निवीर योजनेवर काँग्रेसची आगपाखड; पण हरियाणात अग्निवीरांवर सवलतींचा वर्षाव!