• Download App
    Maharashtra Legislative Assembly Speaker election will be by voice vote

    भाजपचा विरोध डावलून विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आवाजी मतदानानेच घेण्याचा निर्णय; पण राज्यपाल मंजुरी देणार??

    प्रतिनिधी

    मुंबई : नियमावली समितीच्या बैठकीत भाजपचा सदस्यांचा विरोध डावलून महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक नियमावली बदलून ती आवाजी मतदानाने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Maharashtra Legislative Assembly Speaker election will be by voice vote

    आता विधानसभा अध्यक्षांची निवड ही आवाजी मतदानानेच होणार आहे. नियम समितीच्या आज पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या निर्णयाला आता राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळवून तो राज्यपालांकडे पाठवण्यात येईल आणि राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी तो निर्णय मंजूर केला, तरच विधानसभा निवड अध्यक्षांची निवडणूक आवाजी मतदानाने होईल. राज्यपाल काय निर्णय घेतात यावर ही निवडणूक अवलंबून आहे.

    22 डिसेंबरला विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नियम बदलाचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. नाना पटोले हे विधानसभा अध्यक्षपदावरुन पायउतार झाल्यानंतर अद्याप विधानसभा अध्यक्षांची निवडणूक झालेली नाही. त्यावरुन भाजप नेते सातत्याने राज्य सरकारवर हल्ला चढवत आहेत. अशावेळी आता विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आवाजी मतदानानेच घेण्यात येइल.

    नियम समितीच्या बैठकीत भाजप सदस्य डॉ. संदीप धुर्वे, जयकुमार गोरे, धनंजय गाडगीळ यांनी नियम बदलाला तीव्र विरोध केला. उत्तर प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये अध्यक्ष आणि सभापती निवडीबाबत गुप्त मतदानाची पद्धत आहे. ही पद्धत महाराष्ट्रात बदलण्यासाठी कोणतेही ठोस कारण नसताना हा निर्णय का घेतला जात आहे? असा सवाल भाजप सदस्यांनी उपस्थित केला.

    महाराष्ट्र हा देशाला दिशा देतो. विधानसभेच्या अमृत महोत्सवी वर्षात हा नियम बदलण्यामागे नेमके कारण काय? असा सवालही भाजपने उपस्थित केला. भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या दिवशी म्हणजे 6 जुलैला झालेल्या नियम समितीच्या बैठकाला भाजप सदस्यांना हेतुपुरस्सर बोलावण्यात आले नव्हते, असा आरोपही भाजप सदस्यांनी केला आहे. या बैठकीत नियम बदलण्याच्या विषयावर चर्चा झाली होती. नियम समितीच्या बैठकीत नियमबाह्य कृती केल्याचा भाजप सदस्यांचा आरोप आहे. त्यावर 22 सप्टेंबरला झालेल्या बैठकीत चूक मान्य करताना ती अनावधानाने झाल्याचे उपाध्यक्षांनी मान्य केले आहे.

    – चंद्रकांत पाटलांचे आव्हान

    सर्वसामान्य लोकांप्रमाणेच महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधीसुद्धा या सरकारला कंटाळले असल्याने गुप्त मतदानाची संधी मिळताच त्यांनी भाजपला मतदान केले आणि विधान परिषदेच्या नागपूर आणि अकोला, बुलढाणा, वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये भाजपाचे उमेदवार मोठ्या आघाडीने विजयी झाले. हिंमत असेल तर महाविकास आघाडीने विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक मूळ नियम आणि परंपरेप्रमाणे गुप्त मतदानाने घ्यावी, असे आव्हान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिले होते.

    Maharashtra Legislative Assembly Speaker election will be by voice vote

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!