Maharashtra Landslide Updates : राज्यात पावसाचा जोर कायम असून आतापर्यंत विविध ठिकाणी घडलेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनांमध्ये 72 जण दगावले आहेत, तर अनेकांचा शोध सुरू आहे. एनडीआरएफ व एसडीआरएफची पथके ठिकठिकाणी मदत व बचाव कार्य वेगाने करत आहेत. दरम्यान, साताऱ्याच्या देवरुख वाडीत माळीणसारखी दुर्घटना घडली असून बचाव पथकांनी आतापर्यंत 27 जणांना वाचवण्यात यश मिळाले आहे. Maharashtra Landslide Updates NDRF Teams rescue Operations Ajit Pawar rajnath singh Phone
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात पावसाचा जोर कायम असून आतापर्यंत विविध ठिकाणी घडलेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनांमध्ये 72 जण दगावले आहेत, तर अनेकांचा शोध सुरू आहे. एनडीआरएफ व एसडीआरएफची पथके ठिकठिकाणी मदत व बचाव कार्य वेगाने करत आहेत. दरम्यान, साताऱ्याच्या देवरुख वाडीत माळीणसारखी दुर्घटना घडली असून बचाव पथकांनी आतापर्यंत 27 जणांना वाचवण्यात यश मिळाले आहे.
राज्यात 10 ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू
रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता.महाड), गोवेले साखरसुतारवाडी व केवनाळे (ता.पोलादपूर), तसेच रत्नागिरी जिल्ह्यात खेड, सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू झाले आहेत.
देवरुखवाडीतील दुर्घटनेत 2 महिलांचा मृत्यू, 27 जणांना वाचवले
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या बर्याच भागात संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक दुर्घटना झाल्या आहेत. या घटनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी परिस्थितीची माहिती घेतली. सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातील देवरूखवाडी येथे माळीण सारखी दुर्दैवी घटना घडली. भूस्खलन झाल्याने 7 ते 8 घरे जमिनीत गाडली गेली होती. यामध्ये 27 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले तर जखमींना वाई येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र या दुर्घटनेत 4 जण बेपत्ता झाले होते. यामध्ये दोन महिलांचा समावेश होता.. आज शोधकार्य करताना मातीच्या ढिगाऱ्याखालून 2 महिलांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.. यामध्ये 60 वर्षाची वृद्ध महिला आणि 25 वर्षाची महिला मातीच्या ढिगाऱ्याखाली रात्रीपासून अडकल्या होत्या. मातीचा ढीग अंगावर पडल्याने दोन्ही महिलांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
चिपळूणच्या पोसरे-बौद्धवाडीत 17 घरांवर दरड कोसळली
एकीकडे महाडचं तळीये गाव उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे चिपळूणच्या पोसरे-बौद्धवाडीतही दरड कोसळल्यामुळे 17 जण ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर खेडमधल्या धामणंदमध्ये 17 घरांवर दरड कोसळली आहे. यात काही कुटुंब अडकले असण्याची शक्यता आहे. खेड तालुक्यातील बिरमई इथं दरड कोसळलून 2 जण दगावले आहेत.
अजित पवार यांचा राजनाथ सिंहांना फोन, लष्कराची मागितली मदत
रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळून निर्माण झालेल्या आपत्कालिन परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन त्यांना सद्यस्थितीची माहिती दिली. राज्यात अतिवृष्टी व दरड कोसळलेल्या भागात सैन्यदलांची मदत तात्काळ उपलब्ध करण्यात आली असून सैन्यदलांची अधिकची मदतही उपलब्ध करण्याचे आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
राज्यात सध्या ज्याप्रकारे पाऊस पडत आहे ती परिस्थिती पाहता आपल्याला अनेक गोष्टींची व्याख्याच बदलावी लागेल. अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहेत, नद्या फुटून वाहत आहेत. अतिवृष्टी हा शब्दही थिटा पडेल इतका पाऊस होत आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
Maharashtra Landslide Updates NDRF Teams rescue Operations Ajit Pawar rajnath singh Phone
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : यावर्षी इयत्ता १ली ते १२ वीपर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
- देश हळहळला : रायगड, सातारा, पोलादपूर भूस्खलनात मृतांची संख्या 72 वर, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक, जाहीर केली मदत
- UP Elections 2022 : 13 टक्के ब्राह्मण आणि 23 टक्के दलित एकत्र आले तर यूपीत बसपाचे सरकार, सतीश चंद्र मिश्रा यांचा विश्वास
- आत्मनिर्भर भारत : तब्बल दीड लाख विणकर सरकारी ई-मार्केट प्लेस GeM पोर्टलशी जोडले, कोरोना काळातही उत्पादनांची थेट होईल विक्री
- Raj Kundra Case : बस कंडक्टरचा मुलगा ‘कसा’ बनला आयपीएल फ्रँचायझीचा मालक? 2800 कोटींची आहे मालमत्ता