• Download App
    No Separate NA Permission Required in Maharashtra; Building Plan is Now NA आता NA परवानगीची गरज नाही; बांधकाम नकाशा हाच NA, जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची गरज नाही, कायद्यात महत्त्वाची सुधारणा

    Maharashtra : आता NA परवानगीची गरज नाही; बांधकाम नकाशा हाच NA, जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची गरज नाही, कायद्यात महत्त्वाची सुधारणा

    Maharashtra

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Maharashtra मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्याच्या जमीन महसूल कायद्यात मोठा बदल केला आहे. त्यानुसार, आता शेतकऱ्यांना बिगर कृषी (एनए) वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र परवानगी घेण्याची कोणतीही गरज नाही.आता बांधकाम आराखडा मंजुरीलाच एनए मानले जाणार आहे. सरकाच्या या निर्णयाचा राज्यातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.Maharashtra

    राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार जमीन महसूल कायद्यात बदल केला आहे. या बदलानुसार, आता अकृषक कर आकारला जाण्याची सुविधा पूर्णतः रद्द करण्यात आली आहे. जमीन मालकांना फक्त एकरकमी ‘रुपांतरण अधिमूल्य’ भरावे लागेल. या रकमेच्या भरपाईनंतर जमीन अकृषक वापरासाठी रुपांतरित करता येणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना सनद घेण्याची गरजही संपुष्टात आली आहे. बांधकाम आराखडा मंजुरीलाच एनए परवानगी मानली जाईल. यामुळे जमीन रुपांतर प्रक्रिया अधिक जलद, सोपी व पारदर्शक होईल.Maharashtra



    जमीन रुपांतर प्रक्रियेत येणार सुलभता

    उल्लेखनीय बाब म्हणजे आतापर्यंत अकृषक वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र परवानगी घेणे आवश्यक होते. यासाठी विविध दस्तऐवज गोळा करताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत होते. पण महसूल विभागाने तयार केलेल्या नवीन कार्यपद्धतीनुसार शेतकऱ्यांचे काम अधिक सुलभ व सोपे होणार आहे. ही कार्यपद्धती राजपत्रातही प्रकाशित करण्यात आली आहे.

    शासनाच्या या निर्णयामुळे जमीन रुपांतर प्रक्रियेत सुलभता येईल. याशिवाय अकृषक कराचाही त्रास संपेल. महसूल विभागाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता येईल. जमीन मालकांच्या वेळेची बचत होऊन त्यांचा प्रशासनाकडे हेलपाटे मारण्याचा त्रास कमी होईल. विशेषतः यापुडे त्यांना जमिनीचा एनए मिळवण्यासाठी अनेक महिने किंवा वर्षांची प्रतिक्षा करावी लागणार नाही. केवळ रुपांतरण अधिमूल्य भरून ते आपली जमीन अकृषक वापरासाटी रुपांतरित करता येणार आहे.

    काय म्हणाले मंत्री चंद्रशेखर बावनकुळे?

    मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या निर्णयाची माहिती देताना आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, महसूल विभागाचे लोककल्याणासाठी महत्त्वाचे पाऊल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेने महसूल कायद्यात ऐतिहासिक सुधारणा. राजपत्र लागू !!

    * ‘एन. ए.’ परवानगी अन् वार्षिक कर इतिहासजमा
    * बांधकाम नकाशा हीच एन. ए. परवानगी
    * जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची गरज संपली

    राज्यात कृषी क्षेत्र अकृषक करताना एन. ए. परवानगीची अट रद्द करण्यात आली असून, एन. ए. करताना आता नगर रचना विभाग आणि स्थानिक प्राधिकरणाने दिलेली बांधकाम नकाशा परवानगी हीच आता एन. ए. परवानगी असणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून स्वतंत्र बांधकाम परवानगी घेण्याची आवश्यकता असणार नाही.

    * वार्षिक अकृषक कर देखील रद्द
    * मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री मी आज हा निर्णय जारी केला.

    * बँक कर्जासाठी सनदेची अट राहणार नाही.
    * या नव्या नियमांबरोबरच बांधकाम परवानगीसाठी BPMS किंवा Auto DCR द्वारे ऑनलाईन अर्ज करता येईल.
    * बांधकाम परवानगी मिळताच महसूल विभागाच्या संगणकीय प्रणालीद्वारे ७/१२ उताऱ्यात आपोआप फेरफार नोंद घेतली जाणार.
    * दरवर्षी भरावा लागणारा अकृषक कर रद्द करून त्याऐवजी जमिनीच्या बाजारमूल्यानुसार टप्पा निहाय एकरकमी ‘रुपांतरण अधिमूल्य’ (Conversion Premium) आकारले जाईल.

    यासोबतच अनेक सकारात्मक बदल व सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यासंदर्भात याबाबतचा शासन निर्णय वाचवा, असे ते म्हणाले.

    राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून

    दुसरीकडे, राज्य विधिमंडळाच्या मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सोमवार, 23 फेब्रुवारी ते बुधवार, 25 मार्च 2026 पर्यंत निश्चित करण्यात आले आहे. तसेच 6 मार्च रोजी अर्थसंकल्प मांडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांमध्ये दिवंगत अजित पवारा यांच्या अपघाती निधनाविषयी शोक प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.

    अधिवेशन काळात शनिवार, 28 फेब्रुवारी रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज होणार आहे आणि सोमवार, 2 मार्च रोजी होळी आणि 3 मार्च रोजी धूलिवंदन असल्याने कामकाज होणार नाही. 19 मार्चला गुढीपाडव्याची सार्वजनिक सुट्टी असल्याने या दिवशी कामकाज होणार नाही. तसेच 20 मार्च रोजी देखील विधिमंडळ कामकाज होणार नाही.

    अधिवेशनामध्ये येणारे महत्त्वाचे विषय!

    संयुक्त राष्ट्र संघाने सन 2026 हे ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. यावर चर्चा केली जाणार.
    जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक 9 मार्च रोजी दोन्ही सभागृहात चर्चा होणार.
    मराठी भाषा गौरव दिननिमित्त चर्चा होणार.
    सभागृहातून निवृत्त होणाऱ्या सदस्यांचा निरोप समारंभ होणार.

    No Separate NA Permission Required in Maharashtra; Building Plan is Now NA

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    बनावट पोस्टल स्टॅम्प विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, मुंबई पोलिसांची दिल्लीत सापळा रचून कारवाई

    CM Devendra Fadnavis : CM फडणवीस म्हणाले- अजित पवारांच्या मृत्यूचे सत्य निश्चितपणे बाहेर येईल; रोहित पवारांनी तपास यंत्रणांवर विश्वास ठेवावा

    Dada Bhuse : 12वीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी; दोषी पर्यवेक्षकांसह केंद्र अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसेंचा संताप