• Download App
    राष्ट्रकुल स्पर्धा विजेते, महाराष्ट्र केसरी अप्पालाल शेख यांचे अल्पशा आजाराने निधन Maharashtra Kesari Appalala Sheikh no more

    राष्ट्रकुल स्पर्धा विजेते, महाराष्ट्र केसरी अप्पालाल शेख यांचे अल्पशा आजाराने निधन

    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर – महाराष्ट्र केसरी आणि राष्ट्रकुल स्पर्धा विजेते अप्पालाल शेख (वय ५५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चा त तीन मुले आणि मुलगी असा परिवार आहे. Maharashtra Kesari Appalala Sheikh no more

    अप्पालाल यांना १९९१ मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक, तर १९९२ मध्ये महाराष्ट्र केसरीचा किताब त्यांनी मिळवला होता.



     

    मागील काही दिवसापासून त्यांना मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रासले होते, तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अप्पालाल शेख यांच्या घराला कुस्तीचा वारसा आहे. त्यांचे बंधू इस्माईल शेख हे १९८० मध्ये महाराष्ट्र केसरी होते. त्यांच्यापाठोपाठ १९९२ मध्ये अप्पालाल शेख हे महाराष्ट्र केसरी झाले.

    २००२ साली त्यांचे पुतणे मुन्नालाल शेख हे देखील महाराष्ट्र केसरी झाले. एकाच घरात तीन-तीन महाराष्ट्र केसरी असलेले हे एकमेव कुटुंब होते. त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये मजल मारत तेथे सुवर्णपदक पटकावले होते. १९९१ साली न्यूझीलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत अप्पालाल यांनी भारतासाठी सुवर्ण पदक पटकावले.

    Maharashtra Kesari Appalala Sheikh no more

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !