• Download App
    महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शिष्टमंडळाची पवार - फडणवीसांशी चर्चा Maharashtra Integration Youth Committee delegation discusses with Pawar-Fadnavis

    महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शिष्टमंडळाची पवार – फडणवीसांशी चर्चा

    प्रतिनिधी

    मुंबई : बेळगावच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा समितीने समितीच्या शिष्टमंडळाने आज महाराष्ट्रातल्या विविध नेत्यांची भेट घेतली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा समावेश होता. Maharashtra Integration Youth Committee delegation discusses with Pawar-Fadnavis

    यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याशी शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. याबाबत फडणवीस यांनी फेसबुक पोस्ट करत त्यांना सीमाप्रश्‍न सोडविण्यास संदर्भात प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

    या फेसबुक पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगावच्या शिष्टमंडळाने आज प्रदेश भाजप कार्यालयात माझी भेट घेतली आणि त्यांच्या विविध समस्या कथन केल्या. यासंदर्भात मी मा. केंद्रीय अमित शाह जी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी चर्चा करणार आहे. सीमावासियांना संपूर्ण न्याय मिळवून देईन, हे आश्वस्त केले. सीमावर्ती भागातील सर्व मराठी बांधवांच्या पाठीशी महाराष्ट्र भाजपा संघटना ठामपणे उभी आहे आणि राहील.

    Maharashtra Integration Youth Committee delegation discusses with Pawar-Fadnavis

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस