प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र सरकारने आरोग्य विभागात मेगाभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागातील तब्बल 10 हजार रिक्त जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. फेब्रुवारी – मार्च 2023 दरम्यान परीक्षा घेऊन या जागा भरण्यात येणार आहेत. Maharashtra Health Department Recruitment 10000 Posts; Read the schedule
असे आहे वेळापत्रक
1 ते 7 जानेवारी 2023 या काळात आरोग्य विभागातील भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर 25 ते 30 जानेवारी या काळात इच्छुक उमेदवारांच्या अर्जांची छाननी करण्यात येईल. 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असून 25 आणि 26 मार्च 2023 साठी आरोग्य विभागातील विविध पदांसाठी भरती परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर 27 मार्च ते 27 एप्रिल 2023 या एका महिन्याच्या काळात उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
तरुणांची नाराजी दूर करण्यासाठी निर्णय
गेल्या तीन वर्षांपासून राज्याच्या विविध विभागांतील पदे रिक्त आहेत. त्यामुळे या पदांची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. साडे अकरा लाख तरुण भरती प्रक्रियेच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे तरुणांच्या या मुद्द्यांवर तोडगा काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे.
Maharashtra Health Department Recruitment 10000 Posts; Read the schedule
महत्वाच्या बातम्या
- हिंदू दहशतवाद ते श्रीमद्भगवद्गीतेत जिहाद; काँग्रेसी घसरत्या मानसिकतेचा उन्माद
- रमा एकादशीच्या दिवशी पंतप्रधान मोदींचे श्री केदारनाथ दर्शन; पाहा क्षणचित्रे
- ऐन दिवाळीत केंद्र सरकारने डाळींचे दर घटवले; कांद्याचा बफर स्टॉक केला खुला
- फ्रान्सच्या किनाऱ्यावर सावरकरांचा पुतळा उभारणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची गृहमंत्री अमित शाहांशी चर्चा