लसीचा तुटवड्याबाबत राजेश टोपे यांच्या वक्तव्यानंतर केंद्राचा स्पष्ट खुलासा!! Maharashtra has 1.24 crore dose of Kovishield
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाल्यानंतर लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे, असे वक्तव्य आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले होते. यासंदर्भात केंद्र सरकारने स्पष्ट खुलासा केला आहे. यात केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसींच्या पुरवठ्याची आकडेवारी दिली आहे.
सध्या महाराष्ट्राकडे कोविशील्ड लसीचे 1.24 कोटी डोस शिल्लक आहेत. त्याचबरोबर कोव्हॅक्सिन लसीचे 24 लाख डोस शिल्लक आहेत. तसेच आजच महाराष्ट्राला 6.50 लाख डोस पुरवण्यात आले आहेत, असा खुलासा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला आहे.
महाराष्ट्र मध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू झाल्यानंतर कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे, असे वक्तव्य राजेश टोपे यांनी केले होते. त्यावर केंद्र सरकारने आकडेवारीसह संबंधित खुलासा केला आहे.
Maharashtra has 1.24 crore dose of Kovishield
महत्त्वाच्या बातम्या