Maharashtra govt floats global tender : महाराष्ट्र शासनाने राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिव्हिर व ऑक्सिजन तसेच वैद्यकीय उपकरणांसबंधित जागतिक निविदा काढली आहे. महाराष्ट्रासाठी 10 लाख रेमडेसिव्हिर इंजेक्शन्सच्या कुप्या, 40 हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, 25 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याबाबत ही निविदा आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना ही माहिती दिली. Maharashtra govt floats global tender to procure 10 lakh Remdesivir vials & oxygen
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र शासनाने राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिव्हिर व ऑक्सिजन तसेच वैद्यकीय उपकरणांसबंधित जागतिक निविदा काढली आहे. महाराष्ट्रासाठी 10 लाख रेमडेसिव्हिर इंजेक्शन्सच्या कुप्या, 40 हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, 25 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याबाबत ही निविदा आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना ही माहिती दिली.
राजेश टोपे म्हणाले की, निविदा भरण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. जागतिक निविदेद्वारे 10 लाख रेमडेसिव्हिर कुप्या, 40 हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, 132 पीएसए प्लांट्स, 25 हजार मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि आपत्कालीन परिस्थितीकरिता साठवून ठेवण्यासाठी 27 ऑक्सिजन आयएसओ टँक्सची मागणी करण्यात आली आहे. या निविदेचा अंदाजित खर्च सात हजार पाचशे कोटी रुपये असणार आहे.
या निविदेसंबंधी निर्णय घेण्याचे सर्वाधिकार त्रिसदस्यीय समितीला देण्यात आले आहेत. शासनाने ही निविदा भरण्याकरिता तीन दिवसांचा कालावधी दिला असून इच्छुक आपले दर या काळात नोंदवू शकतात. तुम्ही याला पुरवठादारांच्या अपेक्षा जाणून घेण्याचे कुतूहलही म्हणू शकता, असेही मंत्री टोपे म्हणाले.
महाराष्ट्रात सध्या कोरोना संकटाच्या काळात रुग्णांवर उपचारांसाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिर इंजेक्शनची मोठी मागणी आहे. सोमवारी राज्यात 48,700 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. याबरोबरच राज्यातील एकूण बाधितांचा आकडा 43,43,727 वर गेला आहे. तर एका दिवसात 524 मृत्यूंमुळे एकूण मृतांची संख्या 65,284 वर गेली आहे.
Maharashtra govt floats global tender to procure 10 lakh Remdesivir vials & oxygen
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तुम्हाला सांभाळता येत नसेल तर तसे सांगा, आम्ही केंद्राला सांगू’; दिल्ली हायकोर्टाने केजरीवाल सरकारला फटाकारले
- कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताला मिळाली फ्रान्सची साथ, राष्ट्रपती मॅक्रॉन यांचा हिंदीतून भावनिक संदेश, वैद्यकीय उपकरणांसह ऑक्सिजन जनरेटरही पाठवणार!
- सर्वोच्च न्यायालय म्हणाले, या राष्ट्रीय आपत्तीत आम्ही मूकदर्शक बनून राहू शकत नाही, लसींच्या किमती वेगवेगळ्या का?
- पंजाबातील शेतकऱ्यांचे चेहरे आनंदाने उजळले, पहिल्यांदाच MSPवर आधारित तब्बल 8,180 कोटी रुपये थेट बँक खात्यात जमा
- धक्कादायक : एकाच रुग्णवाहिकेत कोंबले 22 कोरोना रुग्णांचे मृतदेह, बीडमधील भयंकर घटनेने संतापाची लाट