महाराष्ट्रातील उद्योग व्यवसायांना चालना मिळण्यासाठी “उद्योग रत्न” पुरस्काराची संकल्पना
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र भूषण या महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात येणाऱ्या सर्वोच्च पुरस्काराच्या धर्तीवर महाराष्ट्र शासन “उद्योग रत्न” पुरस्कार देणे सुरू करणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाचा पहिलाच उद्योग रत्न पुरस्कार टाटा समूहाचे सर्वेसर्वा नामांकित उद्योजक रतन टाटा यांना देण्यात येणार आहे. Maharashtra Governments first Udyogratna Award’ announced to veteran industrialist Ratan Tata
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या बैठकीत पहिला पुरस्कार टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. हाराष्ट्रातील उद्योग व्यवसायांना चालना मिळण्यासाठी “उद्योग रत्न” पुरस्काराची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.
ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना उद्योग रत्न पुरस्कार देण्याचा निर्णय झाल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल विधानपरिषदेत दिली. ‘महाराष्ट्र उद्योगरत्न’ पुरस्कारासह तरुण, महिला आणि मराठी उद्योजकांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचेही यावेळी सामंत यांनी स्पष्ट केले.
यावर्षीच्या एप्रिलमध्ये रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान, ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ने गौरवण्यात आलं होतं. तसेच त्यांना इतरही अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
Maharashtra Governments first Udyogratna Award announced to veteran industrialist Ratan Tata
महत्वाच्या बातम्या
- कटिहार गोळीबार प्रकरणी गिरीराज सिंह यांचे नितीश कुमार सरकारवर टीकास्त्र, म्हणाले ‘धृतराष्ट्र बनले आहेत…’
- द्रष्टे उद्योगपती रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार जाहीर; राज्य सरकारची घोषणा
- राष्ट्रवादीत कोण कुणाकडे?? : झाकली मूठ फक्त 54 आमदारांची; पण स्वप्नं मात्र मुख्यमंत्री पदाची!!
- भारतीय तटरक्षक दलाने समुद्रात अडकलेल्या ‘सिंधू साधना’ संशोधन जहाजातून आठ शास्त्रज्ञांसह ३६ जणांची केली सुटका!