• Download App
    मलकापूर अपघातातील मृतांच्या वारसांना महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर Maharashtra government has announced an aid of five lakhs each to the heirs of the victims of the Malkapur accident

    मलकापूर अपघातातील मृतांच्या वारसांना महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर

    या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून १९ प्रवासी जखमी झाले आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :  मलकापूर (जि. बुलढाणा) शहरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील रेल्वे उड्डाणपुलावर आज दोन खाजगी बसच्या अपघातामुळे झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अपघाताची माहिती घेतली असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश दिले आहेत. Maharashtra government has announced an aid of five lakhs each to the heirs of the victims of the Malkapur accident

    या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून १९ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

    याचबरोबर, ‘’मलकापूर (जि. बुलढाणा) येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील रेल्वे उड्डाणपुलावर दोन खाजगी एसटी बसचा दुर्दैवी अपघात झाला. या घटनेत प्राण गमवावे लागले त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसाला प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देणार असून अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार आहेत, असा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.’’ अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

    अमरनाथ यात्रा करून हिंगोलीकडे परतणाऱ्या बालाजी ट्रॅव्हल्स क्रमांक (एम एच 08 9458) तर नागपूरकडून नाशिककडे जात असलेल्या रॉयल ट्रॅव्हल्स (क्र. एम.एच.27 बीएक्स 4466) या दोन्ही वाहनांचा भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच डीवाय एसपी दयाराम गवई, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तायडे यांच्या सह कर्मचारी दाखल झाले. मलकापूर पोलीस कर्मचारी तथा परिसरातील विविध नागरिक मदतीला घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे या अपघातातील अनेकांना तत्काळ उपचारार्थ हलविण्यात येऊन अनेकांची प्राण वाचले. झालेल्या अपघातामुळे रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागून वाहतूक ठप्प झाली होती. एक तासाच्या कालावधीनंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

    Maharashtra government has announced an aid of five lakhs each to the heirs of the victims of the Malkapur accident

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ