महाविकास आघाडी सरकार काळात झालेले सर्व आरोपही रद्द केले
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. Maharashtra government drops all charges against former Mumbai police commissioner Param Bir Singh
भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर महाविकास आघाडी सरकारने परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकारच्या या नवीन निर्णयानंतर निलंबनाच्या कालावधीत परमबीर सिंह हे सेवेवर होते, असं गृहीत धरलं जाणार आहे.
परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. यानंतर मोठी खळबळ माजली होती, शिवाय अनिल देशमुखांना तुरुंगातही जावे लागले. परमबीर सिंह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट पत्र पाठवले होते आणि पोलिसांना विविध ठिकाणांहून पैसे गोळा करायला सांगितले जातात, पैसे गोळा करण्याचे टार्गेट दिलं जातं, असे आरोप परमबीर सिंह यांनी केले होते.
याशिवाय दुसऱ्या बाजूला परमबीर सिंह यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने डिसेंबर २०२१ मध्ये त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.
Maharashtra government drops all charges against former Mumbai police commissioner Param Bir Singh
महत्वाच्या बातम्या
- अदानी-हिंडेनबर्ग वादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, तज्ज्ञांच्या समितीने न्यायालयात अहवाल सादर केला
- द फोकस एक्सप्लेनर : दिल्ली सरकारच्या कामकाजात नायब राज्यपालांना आता कोणते अधिकार? सर्वोच्च निकालानंतर किती बदल होईल? वाचा सविस्तर
- एलन मस्क सोडणार ट्विटरचे सीईओ पद, 6 आठवड्यांत महिला सीईओ करणार जॉइन
- पंतप्रधान मोदी आज गुजरात दौऱ्यावर, 4400 कोटींच्या प्रकल्पांची करणार पायाभरणी