• Download App
    ठाकरे सरकारचा 'पारदर्शी' कारभार!, कोविड पोर्टलवर साडेअकरा हजार मृत्यूंची नोंदच नाही । Maharashtra Government Covid Portal not recorded 11 thousand covid deaths

    ठाकरे सरकारचा ‘पारदर्शी’ कारभार!, कोविड पोर्टलवर साडेअकरा हजार मृत्यूंची नोंदच नाही

    Maharashtra Government Covid Portal : जगाच्या तुलनेत महाराष्ट्राचा कोरोना मृत्यूंच्या बाबतीत 10वा क्रमांक लागतोय. राज्यातील ठाकरे सरकारने कोरोना व्यवस्थापनासंदर्भात सर्व आकडेवारी पारदर्शक असल्याचे यापूर्वी अनेकदा सांगितले आहे. कोणतीही लपवाछपवी होत नसल्याचा दावा सरकारने केला आहे. परंतु मृतांची माहिती देणाऱ्या शासनाच्या अधिकृत पोर्टलवर राज्यातील 11 हजार 617 मृत्यूंची नोंदच नसल्याचे आता समोर आले आहे. यासंदर्भात ‘महाराष्ट्र टाइम्स’ने सविस्तर वृत्त दिले आहे. Maharashtra Government Covid Portal not recorded 11 thousand covid deaths


    पुणे : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात सर्वाधिक कहर महाराष्ट्रात केला आहे. महाराष्ट्रातील मृत्यूंची संख्या एक लाखाच्याही पुढे गेली आहे. ही संख्या जगातील अनेक देशांतील कोरोना मृत्यूंपेक्षा जास्त आहे. जगाच्या तुलनेत महाराष्ट्राचा कोरोना मृत्यूंच्या बाबतीत 10वा क्रमांक लागतोय. राज्यातील ठाकरे सरकारने कोरोना व्यवस्थापनासंदर्भात सर्व आकडेवारी पारदर्शक असल्याचे यापूर्वी अनेकदा सांगितले आहे. कोणतीही लपवाछपवी होत नसल्याचा दावा सरकारने केला आहे. परंतु मृतांची माहिती देणाऱ्या शासनाच्या अधिकृत पोर्टलवर राज्यातील 11 हजार 617 मृत्यूंची नोंदच नसल्याचे आता समोर आले आहे. यासंदर्भात ‘महाराष्ट्र टाइम्स’ने सविस्तर वृत्त दिले आहे.

    महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कोविड पोर्टलवर अतिरिक्त 11,617 मृत्यूंची नोंदच करण्यात आलेली नाही. आता तशी नोंद येत्या दोन दिवसांत करण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने बुधवारी दिले आहेत. यामध्ये पुणे विभागातील सर्वाधिक 5768 मृत्यूंची नोंद झालेली नाही. यामध्ये पुणे जिल्हा, सातारा व सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे.

     

    मृतांची नोंद न करणाऱ्या संबंधित जिल्हा शल्य चिकित्सकांना कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. नोंदी पूर्ण झाल्यानंतर राज्यातील मृतांच्या संख्येत किमान दहा टक्के वाढ होणार असून याबाबत एवढा निष्काळजीपणा का दाखवला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

    राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पॉझिटिव्ह रुग्णांसह मृतांच्या एकूण आकडेवारीची माहिती महाराष्ट्र टाइम्सने प्रसिद्ध केली आहे. यानुसार 18 सप्टेंबर 2020 ते 20 मे 2021 या काळात जिल्हा आरोग्य यंत्रणेद्वारे राज्याच्या आरोग्य विभागाला पाठवलेल्या अहवालात नोंदवलेले मृत्यू आणि आरोग्य विभागाने दाखवलेल्या मृतांच्या नोंदींमध्ये तफावत आहे. यामुळे या काळातील तब्बल 11,617 मृत्यूंची नोंदच पोर्टलवर झालेली नसल्याचे समोर आले आहे.

    आता राज्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी खात्यातील अधिकाऱ्यांना व्हॉट्सअप ग्रुपवर संदेश पाठवला असून नोंद नसलेल्या मृतांच्या आकडेवारीबाबत आरोग्य अधिकाऱ्यांना सतर्क केले आहे.

    Maharashtra Government Covid Portal not recorded 11 thousand covid deaths

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    MLA Amol Khatal : शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला; मंत्री विखे पाटलांनी केला हल्ल्याचा निषेध

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत- कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही; पण मराठा नेत्यांनी अभ्यास करून मागणी करावी