• Download App
    महाराष्ट्राकडे अत्यंत महत्त्वाची खाती; राणे मध्यम – लघू उद्योगमंत्री, डॉ. भागवत कराड अर्थ राज्यमंत्री, डॉ. भारती पवार आरोग्य राज्यमंत्री, दानवे रेल्वे राज्यमंत्री Maharashtra gets Important portfolios; Narayan Rane MSME, Dr. Bhagwat Karad MOS Finance, Dr. Bharati Pawar MOS Health - Family Welfare

    महाराष्ट्राकडे अत्यंत महत्त्वाची खाती; राणे मध्यम – लघू उद्योगमंत्री, डॉ. भागवत कराड अर्थ राज्यमंत्री, डॉ. भारती पवार आरोग्य राज्यमंत्री, दानवे रेल्वे राज्यमंत्री

    • कपिल पाटील यांच्याकडे पंचायत राज राज्यमंत्रीपद

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या फेरबदलात नारायण राणे यांच्याकडे MSME अर्थात मध्यम, लघू आणि सुक्ष्म उद्योग मंत्रालयाचा कारभार सोपविण्यात आला आहे. हे खाते आधी नितीन गडकरींकडे होते. किरण रिजीजू यांच्याकडे कायदेमंत्रीपद सोपविण्यात आले आहे.

    महाराष्ट्रातल्या राज्यमंत्र्यांकडेही अत्यंत महत्त्वाची खाती आली असून डॉ. भागवत कराड अर्थ राज्यमंत्री, डॉ. भारती पवार आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, तर रावसाहेब पाटील दानवे हे रेल्वे राज्यमंत्री बनले आहेत. कपिल पाटील यांच्याकडे पंचायत राज व्यवस्थेचे राज्यमंत्रीपद आले आहे.

    मनसुख मांडवीय यांच्याकडे देशाच्या आरोग्य मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर आधीचे पेट्रोलिमयमंत्री धर्मेंद्र प्रधान हे नवे शिक्षणमंत्री आणि कौशल्यविकास मंत्री असतील.

    त्यासोबतच नव्याने तयार करण्यात आलेल्या केंद्रीय सहकार विभागाची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. अमित शाह यांच्याकडे सहकार विभागाचा अतिरिक्त भार असणार आहे. त्यासोबतच इतरही महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी नव्याने शपथ ग्रहण केलेल्या मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे.

    केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप

    • पंतप्रधान नरेंद्र मोदी – विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय (अतिरिक्त भार)
    • अमित शाह – सहकार मंत्री (अतिरिक्त भार)
    • मनसुख मांडविया – आरोग्य मंत्री, रसायन मंत्री
    • ज्योतिरादित्य सिंदिया – हवाई वाहतूक मंत्री
    • अनुराग ठाकूर – माहिती व प्रसारण मंत्री, युथ अफेअर्स
    • सर्वानंद सोनोवाल – आयुष मंत्रालय
    • भूपेंद्र यादव – कामगार, पर्यावरण – हवामान बदल मंत्री
    • डॉ. भागवत कराड – अर्थ राज्यमंत्री
    • डॉ. भारती पवार – आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री
    • राजीव चंद्रशेखर – कौशल्य विकास राज्यमंत्री
    • मीनाक्षी लेखी – परराष्ट्र राज्यमंत्री
    • अजय भट – संरक्षण राज्यमंत्री
    • कपिल पाटील – पंचायत राज राज्यमंत्री

    Related posts

    Mukesh Ambani : मुकेश अंबानी म्हणाले- AI मानवी इतिहासातील सर्वात मोठे तंत्रज्ञान; प्रत्येक भारतीयाला स्वस्त AI देण्याचा संकल्प

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली