नाशिक : Maharashtra election सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांचा उल्लेख महाराष्ट्रातला “भटकता आत्मा” असा केला होता. त्यामुळे पवार खुश झाले होते. कारण त्या प्रचाराचा “रिव्हर्स इम्पॅक्ट” होऊन पवारांच्या पक्षाला निवडणुकीत त्याचा मोठा फायदा मिळाला होता. पवारांचा स्ट्राइक रेट तब्बल 80% राहुल त्यांनी दहा पैकी आठ जागा जिंकल्या होत्या. Maharashtra election
त्यानंतरच्या गेल्या चार-पाच महिन्यांमध्ये शरद पवारांनी वारंवार मोदींना एक उल्लेख करून डिवचले होते. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात प्रचारासाठी अवश्य यावे. ते जिथे – जिथे जाऊन भाषण करतील तिथे भाजपचा पराभव होईल आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकतील. मोदींनी आमच्या विरोधात जरूर भाषणे करावी त्याचा आम्हाला फायदाच होईल, असे पवार म्हणत होते.Maharashtra election
लोकसभेतल्या निवडणुकीचा अनुभव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपली स्ट्रॅटेजी पूर्ण बदलली होती. मोदींनी महाराष्ट्रात येऊन भाषणे केली. त्यांनी सभा कमी घेतल्या नाहीत, पण या सभांमध्ये त्यांनी शरद पवार किंवा ठाकरे यांचा उल्लेख देखील केला नाही. किंवा त्यांच्यावर वैयक्तिक टीकेचे उद्गार काढले नाही. एक प्रकारे पंतप्रधान मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना अनुल्लेख करून मारले. मोदींनी आपले नाव घ्यावे आपल्यावर टीका करावी त्याचा “रिव्हर्स इम्पॅक्ट” आपल्या पक्षाला फायदा मिळवून देईल असा पवारांचा होरा होता. तो मोदींनी पुरता चुकावला.Maharashtra election
Jharkhand झारखंडमध्ये सत्तेत भाजप परतणार की सोरेन सरकार कायम राहणार?
मोदींनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवाले असाच उल्लेख करून त्यांना ठोकून काढले. फक्त बाळासाहेब ठाकरे आणि सावरकरांच्या मुद्द्यावर ठाकरे आणि पवारांना नाव घेऊन त्यांनी आव्हान दिले. भाजप मुख्यालयातल्या कालच्या विजय सभेत देखील पंतप्रधान मोदींनी मुद्दाम बाळासाहेब ठाकरे आणि सावरकरांच्या मुद्द्याचा उल्लेख केला, त्यावेळी त्यांनी पवार + ठाकरे यांना डिवचले, पण त्यांची नावे देखील मुलींनी घेतली नाहीत. पवारांची इच्छा मोदींनी पूर्ण केली नाही. अमित शाह, देवेंद्र फडणवीस, योगी आदित्यनाथ यांनी मोदींना फॉलो केले त्यांनी देखील पवारांवर थेट नाव घेऊन टीका करायचे टाळले.
याचा परिणाम एवढा जबरदस्त झाला की महाराष्ट्राच्या जनतेने असा काही धडाका दिला, की पवारांमधला चाणक्य जनतेनेच धुळीस मिळवला पवारांना फक्त 10 आमदारांचे नेते म्हणून शिल्लक ठेवले. पवार काहीही करू शकतात, पवार म्हणजे महाराष्ट्राचे “चाणक्य” पवार गेम फिरवू शकतात, पवार डाव टाकतात, असली भाषा वापरून मराठी माध्यमे पवारांची भलामण केली. पण तशी भलामण करण्याएवढा देखील “चाणक्याचा अंश” महाराष्ट्रातल्या मतदारांनी पवारांमध्ये शिल्लक ठेवला नाही. पवारांची “चाणक्य” प्रतिमा महाराष्ट्राच्या मतदारांनी धुळीला मिळवली.