• Download App
    महाराष्ट्राचा अर्थसंकल्प तुमच्या सूचनांवर आधारित; फडणवीसांनी मागविल्या जनतेच्या सूचना!! Maharashtra dy cm and finance minister devendra Fadanavis invites suggestions for maharashtra Budget 2023 -24

    महाराष्ट्राचा अर्थसंकल्प तुमच्या सूचनांवर आधारित; फडणवीसांनी मागविल्या जनतेच्या सूचना!!

    प्रतिनिधी

    मुंबई : केंद्र सरकार पाठोपाठ महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्पही सादर होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवे पाऊल पुढे टाकत महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाला जनतेच्या सूचनांची जोड देण्याचा संकल्प केला आहे. Maharashtra dy cm and finance minister devendra Fadanavis invites suggestions for maharashtra Budget 2023 -24

    वेंद्र फडणवीस यांनी जनतेकडून तुमच्या संकल्पनेतील महाबजेट 2023 कसे असावे?, यासंबंधी सूचना मागविल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे ट्विट केले आहे. आणि विविध सोशल हँडल वरून जनतेला सूचना पाठवण्याचे आवाहन केले आहे.

    देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच राज्याचे अर्थमंत्री म्हणून 2023 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सातत्याने जनतेत राहणे आणि जनतेच्या मतांना सर्वोच्च प्राधान्य देणे, हे त्यांचे कायमच वैशिष्ट्य राहिले आहे. याच भूमिकेतून या अर्थसंकल्पासाठी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेकडून काही अभिनव संकल्पना आमंत्रित केल्या आहेत.

    महाराष्ट्रातील जनतेला अर्थसंकल्प कसा हवा, हे देवेंद्र फडणवीस जाणून घेणार आहेत. त्यामुळे आता क्षणाचाही विलंब न करता, या अर्थसंकल्पात तुम्हाला काय हवे आणि तुमच्या नाविन्यपूर्ण संकल्पना कोणत्या, यावर तत्काळ लिहा…

    आपल्या सूचना तुम्ही खालील संकेतस्थळावर पाठवाव्यात.
    https://t.co/eY6su1Led9

    Maharashtra dy cm and finance minister devendra Fadanavis invites suggestions for maharashtra Budget 2023 -24

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chhagan Bhujbal : राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांचे स्पष्टीकरण- राज्यात LPGचा कोणताही तुटवडा नाही; गॅस, इंधन तुटवड्याच्या फक्त अफवा अन् संभ्रम

    शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीचे नवे पर्व; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना डॉक्टर ऑफ सायन्स मानद पदवी प्रदान!!

    Nitesh Rane : कॅबिनेट मंत्री नीतेश राणे म्हणाले- सिंहस्थ कुंभमेळ्यात केवळ हिंदूंनीच स्टॉल लावावेत; इतरांनी लावले तर उखडून टाकले जातील