• Download App
    महाराष्ट्राचा अर्थसंकल्प तुमच्या सूचनांवर आधारित; फडणवीसांनी मागविल्या जनतेच्या सूचना!! Maharashtra dy cm and finance minister devendra Fadanavis invites suggestions for maharashtra Budget 2023 -24

    महाराष्ट्राचा अर्थसंकल्प तुमच्या सूचनांवर आधारित; फडणवीसांनी मागविल्या जनतेच्या सूचना!!

    प्रतिनिधी

    मुंबई : केंद्र सरकार पाठोपाठ महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्पही सादर होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवे पाऊल पुढे टाकत महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाला जनतेच्या सूचनांची जोड देण्याचा संकल्प केला आहे. Maharashtra dy cm and finance minister devendra Fadanavis invites suggestions for maharashtra Budget 2023 -24

    वेंद्र फडणवीस यांनी जनतेकडून तुमच्या संकल्पनेतील महाबजेट 2023 कसे असावे?, यासंबंधी सूचना मागविल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे ट्विट केले आहे. आणि विविध सोशल हँडल वरून जनतेला सूचना पाठवण्याचे आवाहन केले आहे.

    देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच राज्याचे अर्थमंत्री म्हणून 2023 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सातत्याने जनतेत राहणे आणि जनतेच्या मतांना सर्वोच्च प्राधान्य देणे, हे त्यांचे कायमच वैशिष्ट्य राहिले आहे. याच भूमिकेतून या अर्थसंकल्पासाठी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेकडून काही अभिनव संकल्पना आमंत्रित केल्या आहेत.

    महाराष्ट्रातील जनतेला अर्थसंकल्प कसा हवा, हे देवेंद्र फडणवीस जाणून घेणार आहेत. त्यामुळे आता क्षणाचाही विलंब न करता, या अर्थसंकल्पात तुम्हाला काय हवे आणि तुमच्या नाविन्यपूर्ण संकल्पना कोणत्या, यावर तत्काळ लिहा…

    आपल्या सूचना तुम्ही खालील संकेतस्थळावर पाठवाव्यात.
    https://t.co/eY6su1Led9

    Maharashtra dy cm and finance minister devendra Fadanavis invites suggestions for maharashtra Budget 2023 -24

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस