Maharashtra Corona Updates : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने सध्या देशात त्सुनामीसारखा कहर केला आहे. महाराष्ट्रात याचा सर्वाधिक प्रभाव दिसत असताना आता एक दिलासादायक वृत्त आहे. मुंबईसारख्या सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या महानगरात मागच्या तीन आठवड्यांच्या तुलनेत आज सर्वात कमी रुग्ण आढळले आहेत. याशिवाय राज्यात आज तब्बल 63,818 जण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. Maharashtra Corona Updates : More than 63,000 patients discharged in 24 hours, Mumbai Records Low Number of patients today
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने सध्या देशात त्सुनामीसारखा कहर केला आहे. महाराष्ट्रात याचा सर्वाधिक प्रभाव दिसत असताना आता एक दिलासादायक वृत्त आहे. मुंबईसारख्या सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या महानगरात मागच्या तीन आठवड्यांच्या तुलनेत आज सर्वात कमी रुग्ण आढळले आहेत. याशिवाय राज्यात आज तब्बल 63,818 जण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत.
राज्यात 24 तासांत 676 जणांचा मृत्यू
मागच्या 24 तासांत राज्यात एकूण 67,160 रुग्णांची नोंद झाली आहे. याचबरोबर तब्बल 63,818 रुग्णांचा डिस्चार्ज मिळाला आहे. नव्या रुग्णांसह राज्यातील सध्याची सक्रिय रुग्णसंख्या 6,94,480 एवढी झाली आहे. तर आजच्या 676 मृत्यूंमुळे राज्यातील एकूण मृतांचा आकडा 63,928 वर गेला आहे. राज्यात आज 63,818 जण बरे होऊन घरी गेल्याने राज्यातील एकूण बरे झालेल्यांची संख्या 34,68,610 वर गेली आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती
सध्याची सक्रिय रुग्णसंख्या : 6,94,480
आतापर्यंतचे एकूण मृत्यू : 63928
आतापर्यंतचे एकूण कोरोनाबाधित : 42,28,836
आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 34,68,610
मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं ट्विट
महाराष्ट्र सरकारचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी बरे होणाऱ्या रुग्णांबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटले की, आज समोर आलेल्या रुग्णांच्या तुलनेत जास्त जण बरे झाले आहेत. नव्या रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे. परंतु हे पुरेसे नाही. घरीच राहा, मास्क वापरा आणि सुरक्षित राहा. दरम्यान, मुंबईत मागच्या 24 तासांत 71 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत काल 7221 रुग्ण आढळले होते, परंतु आज 5888 रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील पॉझिटिव्हिटी रेट मागच्या आठवड्यात 18 टक्के होता, तो आता घटून 15 टक्क्यांवर आला आहे. मुंबईत आज नव्याने आढळलेल्या 5888 रुग्णांच्या तुलनेत 8549 रुग्ण बरे झाले आहेत. मागच्या तीन आठवड्यांच्या तुलनेत मुंबईत आज सर्वात कमी रुग्णसंख्या आढळली आहे.
Maharashtra Corona Updates : More than 63,000 patients discharged in 24 hours, Mumbai Records Low Number of patients today
महत्त्वाच्या बातम्या
- यूपी, एमपीप्रमाणे महाराष्ट्रात मोफत लस मिळणार की नाही? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले हे उत्तर!
- केंद्राने पाळला शब्द : महाराष्ट्राला रेमडेसिव्हिरचा सर्वाधिक पुरवठा, दहा दिवसांसाठी 4 लाख 35 हजार इंजेक्शन्स
- धक्कादायक! दारूची तल्लफ जिवावर उठली, सॅनिटायझर प्यायल्याने यवतमाळमध्ये 7 मजुरांचा मृत्यू
- जबरदस्त : कोव्हॅक्सिन खऱ्या अर्थाने बनले स्वदेशी, कच्च्या मालासाठी अमेरिकीची गरज नाही, उत्पादनही वार्षिक 70 कोटी डोस जगात सर्वाधिक
- 22 मंत्र्यांनी तक्रार करूनही दखल नाहीच, डॉ. व्यास यांना कुणाचे अभय?, आरोग्यमंत्री टोपेंनीही टेकले हात, खात्याचा सचिवही बदलता येईना