• Download App
    तीन आठवड्याच्या लॉकडाऊनची धाकधूक ; आज सर्व पक्षीय बैठकीत निर्णय होणार | Maharashtra Corona Crisis lockdown meeting all party

    तीन आठवड्याच्या लॉकडाऊनची धाकधूक ; आज सर्व पक्षीय बैठकीत निर्णय होणार

    वृत्तसंस्था

    मुंबई :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लागू आहेत. ज्यानंतर सर्व स्तरांतून नकारात्मक प्रतिक्रिया उमटू लागल्या. कोरोना स्थिती पाहता शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. Maharashtra Corona Crisis lockdown meeting all party

    कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे ही बैठक पार पडणार आहे. जिथं दहावी – बारावी बोर्डाच्या परीक्षांसंदर्भातही निर्णय़ घेतला जाणार आहे. त्याशिवाय राज्यात सध्या लागू असणारे निर्बंध आणखी कठोर केले जाणार की त्यामध्ये शिथिलता आणली जाणार यावर निर्णय होणार आहेत.



    कोरोना रुग्णसंख्येचा उंचावता आलेख पाहता येत्या काळात तीन आठवड्यांचा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय़ प्रशासन घेणार का, यासंदर्भातील धाकधूकही लागली आहे. त्यामुळं शनिवार या सर्वपक्षीय बैठकीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

    राज्यात टाळेबंदीची मुदत वाढवावी आणि त्याची कठोरपणे अंमलबजावणी व्हावी, अशा सूचनाच मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. सोबतच मुंबई लोकलबाबतही त्यांनी महत्त्वाचा इशारा दिला होता. त्यामुळं आता मुख्यमंत्री यासंदर्भात सर्व पक्षांतील नेत्यांसोबतच्या चर्चेनंतर कोणत्या निर्यणावर पोहोचतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

    Maharashtra Corona Crisis lockdown meeting all party

    हे ही वाचा

    Related posts

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!