• Download App
    "मनातले" मुख्यमंत्री झाले असते तर महाराष्ट्राला पायलीला 50 नाही, निदान 25 तरी मुख्यमंत्री जास्त मिळाले असते!! Maharashtra chief ministership race : state would have got 25 CM more, but there more its and buts!!

    “मनातले” मुख्यमंत्री झाले असते तर महाराष्ट्राला पायलीला 50 नाही, निदान 25 तरी मुख्यमंत्री जास्त मिळाले असते!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात सध्या “मनातल्या” मुख्यमंत्र्यांचा जोर आहे. जणू काही ते महाराष्ट्रात मनामनांवर राज्य करत आहेत. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यापासून मुंबईपर्यंत खुर्चीवर मांड ठोकून बसले आहेत. मोदी – शाहांच्या मनात असेपर्यंत त्यांना कोणी हटवू शकत नाही. पण मोदी – शाह यांच्या मनात काय आहे??, हे कोणाला ओळखता येत नाही. त्यामुळे अनेकांच्या “मनातले” मुख्यमंत्रीपद “बाहेर” आले आहे. ते महाराष्ट्रातल्या शहरा – शहरांमधल्या पोस्टरवरही लागले आहे. Maharashtra chief ministership race : state would have got 25 CM more, but there more its and buts!!

    पण महाराष्ट्रात असे “मनातले” मुख्यमंत्री झाले असते, तर पायलीला 50 नव्हे, तरी निदान 25 तरी मुख्यमंत्री जास्तीचे मिळाले असते, असे म्हणण्यासारखी परिस्थिती निश्चित आहे. अगदी मुंबई प्रांतापासून ते संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी अशी किमान 25 नावे तरी चर्चेत होती, की जी मुख्यमंत्री होऊ शकली असती. पण त्या नावांपैकी कधीच कुणी मुख्यमंत्री झाले नाही. असे म्हणण्यापेक्षा ते होऊ शकले नाहीत.

    उदाहरणेच द्यायची झाली तर अगदी भाऊसाहेब हिरे, बाळासाहेब देसाई, एस. एम. जोशी, किसन वीर यांच्यापासून ते आत्ताच्या पंकजा मुंडे ते अजितदादा पवारांपर्यंत देता येतील. या प्रत्येक नाव विशिष्ट वजन राखून आहे आणि प्रत्येकाच्या नावाचा आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेचा स्वतंत्र इतिहास आहे. पण या सगळ्यांची नावे “जनतेच्या मनातले” मुख्यमंत्री म्हणून जरी समोर आली असली तरी, ती प्रत्यक्षातली त्यांच्या समर्थकांच्या मनातल्या मुख्यमंत्री पदाची नावे होती आणि आहेत. प्रत्यक्षात दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींच्या मनातली ती नावे नव्हती आणि नाहीत.

    महाराष्ट्रात कोणाला मान्य अथवा नसो, दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींच्या, मग ते पक्षश्रेष्ठी काँग्रेसचे असोत अथवा भाजपचे. अथवा मधल्यामध्ये जनता पक्षाचे, त्यांच्याच मर्जीतले आणि मनातले मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले आहेत. दिल्लीची मर्जी गेली, की महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांचे पद गेले आणि पुन्हा त्यांच्याच मर्जीतल्या नव्या नेत्याला मुख्यमंत्री पद मिळाले आहे. हा इतिहास आहे. हे वर्तमान आहे. भविष्य काय असेल ते काळाच्या उदरात दडले आहे. पण भूतकाळ आणि वर्तमानाच्या प्रकाशात भविष्याचा वेध घेता येतो, हे खरे मानले तर महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री पदाचे भविष्यही “तसेच” आहे!!

    मुख्यमंत्री पदाच्या चर्चेतली नावे

    भाऊसाहेब हिरे, बाळासाहेब देसाई, एस. एम. जोशी, किसन वीर, वसंत साठे, राजारामबापू पाटील, यशवंतराव मोहिते, अभयसिंह राजे भोसले, बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, प्रभाकर कुंटे, सुधीर जोशी, सुरेश जैन, रणजित देशमुख, डॉ. पतंगराव कदम, विलासकाका पाटील, रोहिदास पाटील, उल्हास पवार, गोपीनाथ मुंडे, आर. आर. पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, गुरुदास कामत

    यातली कित्येक नावे तर महाराष्ट्रातल्या सध्याच्या पिढीला माहिती देखील नाहीत. पण गेल्या 60 वर्षांच्या इतिहासात ही नावे खरंच कधी ना कधी तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत आणि चर्चेत होती, ही वस्तुस्थिती आहे!! या स्पर्धेत नावही नसलेले नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन गेले आहेत, त्यांचे नाव बाबासाहेब भोसले असे आहे!!

    आता अजित पवार आणि राधाकृष्ण विखे यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. यातल्या राधाकृष्ण विखे पाटलांनी त्या चर्चेचा इन्कार केला आहे. अजितदादांनी तर खुलेपणानेच मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत आपले नाव जाहीर केले आहे. त्याआधी 2014 ते 2019 या कालावधीत पंकजा मुंडे यांना आपण स्वतः “जनतेच्या मनातल्या” मुख्यमंत्री आहोत, असे वाटत होते. पण अद्याप तरी पंकजा मुंडे मुख्यमंत्री झालेल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात अनेकांना आपण “जनतेच्या मनातले” मुख्यमंत्री होत असे वाटत असले तरी दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींच्या मनात काय आहे?? आणि त्यांच्या मर्जीत कोण येते??, त्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद अवलंबून आहे. ही कोणाला कितीही “कटू” वाटली तरी राजकीय वस्तुस्थिती आहे!!

    Maharashtra chief ministership race : state would have got 25 CM more, but there more its and buts!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!