• Download App
    महाराष्ट्रातली महाचर्चा : मुख्यमंत्रीपद; मनातले, नशिबातले आणि कर्तृत्वातलेMaharashtra chief minister post : by luck, virtue and political caliber

    महाराष्ट्रातली महाचर्चा : मुख्यमंत्रीपद; मनातले, नशिबातले आणि कर्तृत्वातले

    विशेष प्रतिनिधी

    राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सवी सत्कारानिमित्ताने झालेल्या भाषणांमध्ये त्यांना न मिळालेल्या मुख्यमंत्रीपदावर जोरदार चर्चा रंगली. ती चर्चा आज राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी पुढे नेली आहे. एकनाथ खडसे यांना भले मुख्यमंत्री व्हावेसे वाटत असेल, पण त्यांच्या मनातले जनतेच्या मनालाही वाटले पाहिजे आणि माणूस फक्त जातीने, समाजाने मोठा होत नाही. त्याला कर्तृत्व देखील लागते, असे गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना सुनावले आहे. Maharashtra chief minister post : by luck, virtue and political caliber

    भाजप हा वाणी, ब्राह्मणांचा पक्ष राहिला नसून तो बहुजनांचाही पक्ष झाला आहे, असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले होते. या वक्तव्यावरून गिरीश महाजन यांना पत्रकारांनी छेडले असता त्यांनी एकनाथ खडसे यांच्या पहिल्या वक्तव्याचे समर्थन केले. खडसे बोलले ते बरोबरच आहे. भाजप आता फक्त वाणी, ब्राह्मणांचा पक्ष राहिलेलाच नाही. भाजप मध्ये बहुजनांचे नेतृत्व करणारे अनेक नेते आहेत. किंबहुना भाजप सगळ्यात जगातला मोठा पक्ष आहे आणि त्यामुळे सगळ्या जाती समाजाचे प्रतिनिधित्व आहे, असे गिरीश महाजन म्हणाले. पण त्याचवेळी खडसे नेमके ज्या संदर्भात बोलले, तो संदर्भ उचलून गिरीश महाजन यांनी खडसेंना न मिळालेल्या मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावर त्यांना टोला लगावला आहे.

    काल भुजबळांच्या मुख्यमंत्री पदाचा विषय व्यासपीठावरून अजितदादांनी छेडला. त्यावेळी त्यांनी भुजबळ हे 1999 मध्येच मुख्यमंत्री झाले असते. पण काहींच्या नशिबी तो योग नसतो. जसे आम्हा सर्वांना शरद पवार पंतप्रधान व्हावे असे वाटत होते, परंतु ते झाले नाहीत. तसा भुजबळांच्याही नशिबात मुख्यमंत्री पदाचा योग नव्हता, असे अजितदादांचे वक्तव्य होते.

    अजितदादांच्या वक्तव्याला बिनतोड युक्तिवाद म्हणून उद्धव ठाकरे यांनी भुजबळ यांनी शिवसेना सोडली नसती तर ते केव्हाच मुख्यमंत्री झाले असते, असा टोला हाणला. पण एकूण राजकीय चर्चा भुजबळांच्या न मिळालेल्या मुख्यमंत्री पदाभोवती केंद्रित राहिली. ती चर्चा गिरीश महाजन यांच्या आजच्या वक्तव्याने एकनाथ खडसेंच्या न मिळालेल्या मुख्यमंत्री पर्यंत चर्चा येऊन ठेपली आहे.

    महाराष्ट्राच्या राजकारणात अशी न मिळालेली मुख्यमंत्री पदे भरपूर आहेत. दस्तूर खुद्द अजितदादांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. पण अद्याप तो योग आलेला नाही. उद्धव ठाकरेंना 1995 मध्ये शिवसेना-भाजप युतीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री व्हायचे होते, असा खळबळजनक दावा माजी मंत्री सुरेश नवले यांनी करून न मिळालेल्या आणि नंतर मिळालेल्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत भर घातली आहे. पंकजा मुंडे यांना बरीच वर्षे आपण जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री आहोत असे वाटतच होते.

    त्यामध्ये कालपासून न मिळालेल्या मनातल्या, नशिबातल्या आणि कर्तृत्वातल्या मुख्यमंत्री पदाची भर पडली आहे. कारण एकनाथ खडसे यांना न मिळालेल्या मुख्यमंत्रीपदावरून टोला लगावताना गिरीश महाजनांनी राजकीय कर्तृत्वाचा उल्लेख केला आहे आणि तो करताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखवले आहे. देवेंद्रजी यांच्या पाठीशी मोठी जात नाही. समाज नाही. पण ते कर्तृत्वाने किती मोठे आहेत आणि ते कॅलिबरने किती मोठे आहेत हे संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश सांगेल, असे वक्तव्य करून मुख्यमंत्रीपद कर्तृत्वातले या विषयाला देखील तोंड फोडले आहे. आता मुख्यमंत्रीपदाचा मनातला, नशिबातला आणि कर्तृत्वातला विषय नेमकी कोणती वळणे आणि वळसे घेतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.

    Maharashtra chief minister post : by luck, virtue and political caliber

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    फडणवीस सरकारमध्ये राहून पवार संस्कारितांच्या गेमा; भाजपच्या मंत्र्यांना बदनाम करा!!

    Dhananjay Munde : माजी मंत्री धनंजय मुंडेंना 42 लाखांचा दंड का झाला ?

    सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार OBC आरक्षणासह स्थानिक निवडणुका होणार म्हणजे नेमके काय घडणार??, मुख्यमंत्री फडणवीसांनी समजावून सांगितला अर्थ!!