• Download App
    Maharashtra Cabinet Reshuffle: Shinde's Hint, MLA Videosराज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता

    Shinde’s : राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता; उपमुख्यमंत्री शिंदे यांचे सूचक विधान

    Shinde's

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Shinde’s महाराष्ट्रात सध्या आमदारांचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. कोणी मारामारी करत आहे, तर कोणाच्या घरात पैशांनी भरलेली बॅग दिसून येत आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळात मोबाइलवर रम्मी खेळतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक विधान केले आहे.Shinde’s

    पंढरपूर येथे एकनाथ शिंदे यांना संत नामदेव महाराज यांच्या नावे पुरस्कार जाहीर झाला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, आम्ही टीम म्हणून काम करत आहोत. पद खाली वर होत असतात, असे म्हणत त्यांनी मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याच्या चर्चांवर सूचक विधान केले आहे. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, चांगले काम करण्याचा सरकारचा अजेंडा आहे. आमचा अजेंडा खुर्ची नाही, खुर्चीत ज्यांनी बसवले त्यांचे प्रश्न सोडवणे हा आमचा अजेंडा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही सारे एकत्र आहोत, असे शिंदे यांनी म्हटले.



    यावेळी पत्रकारांनी लाडकी बहीण योजनेमुळे सरकार अडचणीत येत आहे का? असा सवाल केला. यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, असे काहीही नाही. एसटी महामंडळाने एकत्र बूकिंगवर 30 टक्के वाढ केली होती. त्याबद्दल मी सकाळीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी बोललो आहे. त्यांनी जी काही वाढ केली आहे ती रद्द करण्यास सांगितले आहे.

    एकनाथ शिंदे यांना संत नामदेव महाराजांच्या नावाने पुरस्कार

    दरम्यान, पंढरपूर येथे आले असता एकनाथ शिंदे यांनी विठोबाकडे साकडे घातले. बळीराजा, शेतकरी आणि वारकरी यांना सुखी ठेवू दे हीच विठ्ठलाकडे साकडे घातले आहे. आषाढी एकादशीला मुखदर्शन घेतले, आज मात्र जास्त वेळ विठ्ठलासमोर बसता आले, दर्शन घेता आले. हे आपले भाग्यच, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. एकनाथ शिंदे यांना संत नामदेव महाराजांच्या नावाने पुरस्कार जाहीर झाला. आज पंढपूरमध्ये एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देण्यासाठी वारकरी संप्रदायातील बडे महाराज मंडळी उपस्थित होते. संत नामदेव महाराज यांच्या 675 वा समाधी सोहळ्या निमित्त शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

    Maharashtra Cabinet Reshuffle: Shinde’s Hint, MLA Videos

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण

    Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला

    Rahul Gandhi : यूपी निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे दावे फेटाळले; कर्नाटक आयोगाने म्हटले- राहुल यांनी प्रतिज्ञापत्र द्यावे