विशेष प्रतिनिधी
मुंबई : अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३-२४चा अर्थसंकल्प मांडताना शिक्षणसेवकांना मिळणारया तुटपुंज्या मानधनात तब्बल दहा हजार रूपयांनी वाढ केली. तसेच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीतही जवळपास पाचपट वाढ केली.
फडणवीसांनी शिक्षणविषय केलेल्या घोषणा पुढीलप्रमाणे : Maharashtra Budget : Big hike for Contractual Teachers and scholarships for students
शिक्षणसेवकांना भरघोस मानधन
- प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक : 6000 वरुन 16,000 रुपये
- माध्यमिक शिक्षण सेवक : 8000 वरुन 18,000 रुपये
- उच्च माध्यमिक शिक्षण सेवक : 9000 वरुन 20,000 रुपये
- पीएमश्री शाळा : 816 शाळा/ 5 वर्षांत 1534 कोटी रुपये
भरीव शिष्यवृत्ती; गणवेशही मोफत
- 5 ते 7 वी : 1000 वरुन 5000 रुपये
- 8 ते 10 वी : 1500 वरुन 7500 रुपये
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार
आदिवासी बांधवांच्या शिक्षणासाठी…
- 250 शासकीय आदिवासी आश्रमशाळांना आदर्श आश्रमशाळा करणार
- अनुसूचित जमातीच्या 100 विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी अधिछात्रवृत्ती
अन्य महत्वाच्या घोषणा
- उच्च शिक्षण घेणार्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती: 25,000 वरुन 50,000 रुपयांवर
- काही विद्यापीठांना पाचशे कोटींचा विशेष निधी
- सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, अंबरनाथ (ठाणे) येथील 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे करणार
- मुंबईतील 200 महापालिका, जि.प.शाळांमध्ये कौशल्य प्रशिक्षण
- 500 आयटीआयची दर्जावाढ (2307 कोटी रुपये)
- 75 आयटीआयचे आधुनिकीकरण (610 कोटी रुपये)
Maharashtra Budget : Big hike for Contractual Teachers and scholarships for students
महत्वाच्या बातम्या
- शरद हे शादाब असते तर सेक्युलरांनी त्यांना भाजपची बी टीम म्हटले असते का??, नागालँड वरून ओवैसींचा पवारांना टोला
- Eric Garcetti Profile : राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे विश्वासू, वादांशी संबंध; आता होणार भारतातील राजदूत, कोण आहेत एरिक गार्सेटी? वाचा सविस्तर
- दिल्लीत मद्य घोटाळ्यात केसीआर यांच्या कन्येला तात्पुरता दिलासा, आमदार कविता यांची आता 11 मार्चला ईडीकडून होणार चौकशी
- नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिल्याने JDU ने राज्य कार्यकारिणीवर केली ‘ही’ मोठी कारवाई