• Download App
    Maharashtra Budget 2026 : Maharashtra Benefits from High-Speed Rail & Growth Hubs द फोकस एक्सप्लेनर : बजेटमध्ये महाराष्ट्राला काय मिळाले? मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक, वाचा सविस्तर

    Maharashtra Budget 2026 : द फोकस एक्सप्लेनर : बजेटमध्ये महाराष्ट्राला काय मिळाले? मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक, वाचा सविस्तर

    Maharashtra Budget 2026 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत सलग नववे केंद्रीय बजेट सादर केले. ८५ मिनिटांच्या या भाषणात ‘विकसित भारत’ हे मुख्य उद्दिष्ट ठेवून विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले असून, “हा अर्थसंकल्प विकसित भारताकडे टाकलेले एक दमदार पाऊल आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे जीडीपीत मोठी वाढ होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.Maharashtra Budget 2026

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सलग नववा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्यांचे बजेट भाषण 85 मिनिटांचे होते. यावर्षीच्या बजेटनुसार, देशभरात 7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर आणि 3 आयुर्वेदिक एम्स बांधले जाणार आहेत. याचबरोबर, कर्करोगाच्या 17 औषधांवरील कस्टम ड्युटी रद्द करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.Maharashtra Budget 2026



    नेमके काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

    विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प आहे. शहरीकरणाला नियोजनबद्ध करुन, उद्योग आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी खंबीर उपाययोजना या अर्थसंकल्पातून करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रात 12 लाख कोटींची गुंतवणूक, शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    लखपती दिदी योजनेच्या यशानंतर महिलांसाठी स्वतंत्र मॉल्स आणि उद्योगांच्या संधी तयार करण्याची योजना अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणार्‍या मुलींसाठी वसतीगृहांची योजना तयार करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात आपात चिकित्सा व्यवस्था उभी करण्याचा निर्णय आरोग्य क्षेत्रात मोलाचा ठरेल, असे फडणवीस म्हणाले.

    मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे जीडीपीत मोठी वाढ होईल. प्रत्येक ग्रोथ हबसाठी 5000 कोटी प्रत्येकी 5 वर्षांत प्राप्त होणार आहेत, त्याचा लाभ मुंबई महानगर (एमएमआर), पुणे महानगर, नागपूर महानगर ग्रोथहबसाठी होणार आहे, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

    अर्थसंकल्पाचा महाराष्ट्राला मोठा फायदा होणार

    अर्थसंकल्पात राज्याला काय काय मिळाले, याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले, विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प आहे. शहरीकरणाला नियोजनबद्ध करुन, उद्योग आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी खंबीर उपाययोजना या अर्थसंकल्पातून करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रात 12 लाख कोटींची गुंतवणूक, शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत, असे देवंद्र फडणवीस म्हणाले. ते अर्थसंकल्पानंतर माध्यमांशी बोलत होते.

    लखपती दिदी योजनेच्या यशानंतर महिलांसाठी स्वतंत्र मॉल्स आणि उद्योगांच्या संधी तयार करण्याची योजना अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणार्‍या मुलींसाठी वसतीगृहांची योजना तयार करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात आपात चिकित्सा व्यवस्था उभी करण्याचा निर्णय आरोग्य क्षेत्रात मोलाचा ठरेल. मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे जीडीपीत मोठी वाढ होईल. प्रत्येक ग्रोथ हबसाठी 5000 कोटी प्रत्येकी 5 वर्षांत प्राप्त होणार आहेत, त्याचा लाभ मुंबई महानगर (एमएमआर), पुणे महानगर, नागपूर महानगर ग्रोथहबसाठी होणार आहे, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

    अर्थसंकल्पाचा महाराष्ट्राला मोठा फायदा होणार आहे. विकसीत भारताकडे नेहणारे हे बजेट आहे. औद्योगिक सवलतीमुळे फोठा फायदा होणार आहे. उद्योग गुंतवणुकीचा आपल्याला फायदा होणार आहे. रेल्वे कोरिडॉरमुळे मुंबई आणि पुणे या दोन शहरातील प्रवास अधिक वेगवान होणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

    बजेट 2026 च्या प्रमुख घोषणा

    मालगाडीसाठी नवीन कॉरिडॉर: पश्चिम बंगालमधील डानकुनीसाठी एका नवीन फ्रेट कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली आहे.
    पायाभूत सुविधांवर मोठा खर्च: पुढील आर्थिक वर्षासाठी (2026-27) 12.2 लाख कोटी रुपयांचा कॅपेक्स (भांडवली खर्च) निश्चित करण्यात आला आहे. हा मागील वर्षाच्या 11.2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

    रेअर अर्थ कॉरिडॉर: केरळ, तामिळनाडू आणि ओडिशा येथे दुर्मिळ खनिजांसाठी विशेष कॉरिडॉर तयार केले जातील. यामध्ये आंध्र प्रदेशलाही जोडले जाईल जेणेकरून खनिज समृद्ध राज्यांना फायदा होईल.

    टेक्सटाईल क्षेत्र: देशात मोठे टेक्सटाईल पार्क तयार केले जातील.

    औषध क्षेत्रातील ‘शक्ती’: 10,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ‘बायो-फार्मा शक्ती’ योजना सुरू होईल, ज्या अंतर्गत तीन नवीन संस्था उघडल्या जातील.

    चिप उत्पादन: भारत आपले सेमीकंडक्टर मिशन ISM 2.0 सुरू करेल.

    इलेक्ट्रॉनिक्सवर भर: मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सचे सुटे भाग बनवण्यासाठी बजेट वाढवून 40,000 कोटी रुपये करण्यात आले आहे.

    अर्थसंकल्पाचे 3 मुख्य व्हिजन

    वेग: उत्पादकता वाढवून आर्थिक विकासाचा वेग वाढवणे.

    क्षमता: लोकांची क्षमता वाढवणे जेणेकरून ते देशाच्या प्रगतीत भागीदार होतील.

    सबका साथ : प्रत्येक कुटुंब आणि क्षेत्राकडे उत्पन्नाचे पुरेसे स्रोत आणि संधी असाव्यात.
    अर्थव्यवस्थेवरील सरकारचा अहवाल

    आत्मनिर्भरता: भारताने स्वतःचे उत्पादन आणि ऊर्जा सुरक्षा वाढवली आहे, ज्यामुळे परदेशातून वस्तू मागवण्यावरील अवलंबित्व कमी झाले आहे.

    विकास दर: मागील सुधारणांमुळे भारताने 7% विकास दर गाठला आहे, ज्यामुळे गरिबी कमी करण्यास मदत झाली आहे.

    12 वर्षांचा प्रवास: अर्थमंत्र्यांनी सांगितले की, गेल्या 12 वर्षांत भारताची अर्थव्यवस्था स्थिर राहिली आहे आणि महागाई नियंत्रणात आहे.

    जागतिक आव्हाने: जगात व्यापार आणि पुरवठा साखळीत अडचणी येत आहेत, परंतु भारत ‘विकसित भारत’ च्या दिशेने पाऊल टाकत राहील.

    Maharashtra  Budget 2026: Maharashtra Benefits from High-Speed Rail & Growth Hubs

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rohit Pawar : अजितदादांचा तेरावा झाल्यावरच राजकीय चर्चा, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबद्दल माहिती नव्हते, रोहित पवार यांची प्रतिक्रिया

    दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची गरजच काय??, “हा” पर्याय उपलब्ध असताना!!

    केंद्रीय अर्थसंकल्पातून विकासित भारताकडे दमदार पाऊल, महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती