विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र हे 1 ट्रिलियन अर्थव्यवस्था झालेले पहिले राज्य आहे, असे जाहीर करत महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी 2022 – 23 चा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला. यंदाचा अर्थसंकल्प पंचसूत्री बजेट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यंदाचे वर्ष महाराष्ट्राने महिला शेतकऱ्यांसाठी समर्पित केले आहे. अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील काही तरतुदी अशा : Maharashtra Budget 2022 1 trilian ajit pawar
- राज्यातल्या सर्व तृतीयपंथीना ओळखपत्र देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम राज्यभर राबविला जाईल
- शालेय शिक्षण विभागा 2353 क्रीडा विभागाला 385 कोटी
- शिष्यवृत्ती, फेलोशिप याद्वारे सर्व विभागांच्या योजना लाभार्थ्यांच्या आधार कार्डशी जोडणार
- संगणक आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता संदेशवहन उपग्रहण, ड्रोन टेक्नॉलॉजी जागतिक तंत्रज्ञानाच्या युगात युवकांना संधी मिळावी म्हणून इनोव्हेशन हब सुरु करण्यात येणार प्रत्येक विभागात स्थापना होणार
- तरुणांना विशेष संधी निर्माण करुन देण्यासाठी स्टार्ट अपसाठी भांडवल 100 कोटी रकमेचा शासनाचा स्टार्ट अप फंड उभारण्यात येणार
- कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाला 615 कोटी रुपयांची
- लता मंगेशकर यांच्या नावानं उभारण्यात येणाऱ्या केंद्रासाठी 100 कोटी
- शिवाजी विद्यापीठातील केंद्रासाठी 10 कोटी आणि मुंबई च्या रत्नागिरीतील उपकेंद्रासाठी 2 कोटी रुपये
- महापुरुषांच्या नावे अध्यासन केंद्र उभारण्यासाठी 3 कोटी रुपये. एसएनडीटी विद्यापीठाला 10 कोटी
- महर्षी कर्वे, साने गुरुजी, सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या गावातील शाळांची स्थिती सुधारण्यासाठी 1 कोटी निधी
- शाळांच्या सोयी सुविधांसाठी जिल्हा स्तरावर 5 टक्के निधी
- शालेय शिक्षण विभागा 2353 क्रीडा विभागाला 385 कोटी
- मुंबईतील बैलघोडा पशूवैद्यकीय रुग्णालयाला १० कोटी रुपयाचा निधी
- कृषी विभागाच्या योजनांमध्ये तीन टक्के निधी यापुढे आजी-माजी सैनिकांना उपलब्ध करून देणार
- मुख्यमंत्री शाश्वत निधी योजना, शेततळ्यासाठी अनुदानात ७५ हजारापर्यंत वाढ
- विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस आणि सोयाबीन, विशेष कृती योजनेसाठी १००० कोटींचा निधी
- जलसंपदा विभागासाठी १३ हजार २५२ कोटींची घोषणा
- छत्रपति संभाजी महाराजांचे स्मारक हवेलीत उभारणार, २५० कोटींची तरतूद
- हिंगोलीत बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारणार
- शेतकरी कल्याणासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद. कृषी, आरोग्य, मनुष्यबळ, दळणवळण आणि तंत्रज्ञान विकासाची पंचसूत्री
- आरोग्य सेवांवर आगामी तीन वर्षात 11 हजार कोटी खर्च करणार
- कोरोना काळात राज्याचं देशासह जगभरात कौतुक
- माझे कुटुंब माझी जबाबदारी. हर घर दस्तक योजना राबवली
- नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर येथे ट्रामा केअर युनिट स्थापणार
- ग्रामीण भागातील किडनीच्या रुग्णांसाठी लेप्रोस्कॉपी मोफत करण्यात येणार यासाठी 17 कोटी 60 लाख रुपये खर्च करणार
- मोतिबिंदू उपचार पद्धती आधुनिकीकरण
- कर्करोग उपचारासाठी 8 कोटी रुपये
- अकोला येथे स्त्री रुग्णालयाची स्थापना करण्यात येणार
- जालना येथे 365 खाटांचे मनोरुग्णालय स्थापन करण्यात येणार
- ग्रामीण भागातील जनतेसाठी शिवआरोग्य योजना सुरु करण्यात येणार
- प्राथमिक आरोग्य केंद्र,उपजिल्हा रुग्णालय पातळीवर याचा विस्तार करण्यात येणार
- देशातील होतकरु युवकांना इथेच वैद्यकीय शिक्षण मिळावं म्हणून प्रवेश संख्येत वाढ करण्यात येणार
- पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी मुंबई, नाशिक आणि नागपूरमध्ये संस्था स्थापन करण्यात येणार
- पुणे शहराजवळ इंद्रायणी मेडिसीटी उभारण्याचा शासनाचा प्रयत्न असेल
- सर्व उपचार पद्धती असलेलं केंद्र निर्माण करण्यात येणार 2061 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार
- महिला शेतकरी सन्मान योजना
व्याज सवलत योजनेअतंर्गत हे वर्ष महिला शेतकरी, शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून राबवण्यात येईल - खरिप व रब्बी पणन हंगाम शेतमाल खऱेदी अंतर्गत विक्रमी खरेदी
- सोसायट्यांचं संगणकीकरण करुन कोअर बँकिंगद्वारे जोडणार
- पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय विभागाल 406 कोटी
- राज्यातील कृषी उत्पन्न समितीसाठी १० कोटी गुंतवणूक होणे अपेक्षित
- कर्ज भरणा-यावर शेतक-यांना ५० हजार पोत्साहनपर मिळणार
- राज्यातील कृषी उत्पन्न समितीसाठी १० कोटी गुंतवणूक होणे अपेक्षित आहे
- हवेलीत संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी २५० कोटी रूपये
- नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार
- राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल; राज्यात 1.88 लाख कोटींची गुंतवणूक
- मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत जून, 2020 ते डिसेंबर, 2021 मध्ये राज्यात 1.88 लाख कोटी गुंतवणूक व 3.34 लाख अपेक्षित रोजगार असलेले प्रस्ताव प्राप्त झाले. महाराष्ट्र इलेक्ट्रीक व्हेईकल प्रोत्साहन धोरण, 2018 अंतर्गत पाच इलेक्ट्रीक वाहन उत्पादन घटक आणि एका बॅटरी उत्पादन घटकाकडून 8,420 कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यामध्ये 9,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे ऑक्टोबर, 2021 अखेर राज्यात 10,785 स्टार्ट-अप होते, असे पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे.
- सेवा आणि उद्योग क्षेत्रात भरीव वाढ अपेक्षित
- आर्थिक पाहणीनुसार यंदाच्या आर्थिक वर्षात कृषि व संलग्न कार्ये क्षेत्रात 4.4 टक्के वाढ, उद्योग क्षेत्रात 11.9 टक्के वाढ आणि सेवा क्षेत्रात 13.5 टक्के वाढ अपेक्षित आहे. पूर्वानुमानानुसार 2021-22 मध्ये सांकेतिक (‘नॉमिनल’) (चालू किंमतीनुसार) स्थूल राज्य उत्पन्न 31,97,782 कोटी अपेक्षित आहे. वास्तविक (‘रिअल’) (सन 2011-12 च्या स्थिर किंमतीनुसार) स्थूल राज्य उत्पन्न 21,18,309 कोटी अपेक्षित आहे. 2021-22 अर्थसंकल्पीय अंदाजानुसार राज्याची महसुली जमा 3,68,987 कोटी, कर महसूल 2,85,534 कोटी आणि करेतर महसूल 83,453 कोटी (केंद्रीय अनुदानासह) आहे. एप्रिल ते नोव्हेंबर,2021 या कालावधीत प्रत्यक्ष महसुली जमा 1,80,95 4कोटी आहे. 2021-22 नुसार राज्याचा महसुली खर्च 3,79,213 कोटी सन 2020-21 च्या सुधारित अंदाजानुसार विकास खर्चाचा एकूण महसुली खर्चातील हिस्सा 68.1 टक्के आहे.