विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने विदर्भ आणि मराठवाड्यातल्या नेत्यांना संधी दिली आहे. संदीप जोशी, संजय केणेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. विधान परिषदेतले आमदार विधानसभेत निवडून आल्यामुळे रिक्त झालेल्या जागांवर ही निवडणूक होत असून संख्याबळ लक्षात घेता भाजपचे तीन तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी एक उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने आपल्या कोट्यातले तीन उमेदवार जाहीर केले.
भाजपने 20 संभाव्य उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवली होती. त्यावर दिल्लीत भाजप श्रेष्ठींनी विचारविनिमय करून तीन नावे निश्चित केली. त्यात विदर्भ आणि मराठवाड्याला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट झाले. उमेदवारी मिळालेल्या पैकी संदीप जोशी हे नागपूरचे माजी महापौर आहेत. दादाराव केचे हे विदर्भातलेच नेते आहेत, ते आर्वी मतदारसंघाचे दोन वेळा आमदार होते, तर संजय केणेकर हे छत्रपती संभाजी नगरचे नेते आहेत.
गोपीचंद पडळकर, आमश्या पडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर आणि रमेश कराड हे विधान परिषदेचे सदस्य विधानसभेवर निवडून गेल्यामुळे रिक्त झालेल्या जागांवर निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्या एकच जागा येणार असली तरी त्या पक्षात इच्छुकांची तुडुंब गर्दी होऊन तब्बल 100 इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज दाखल केले. पण अजित पवार अद्याप निर्णय घेऊ शकलेले नाहीत. एकनाथ शिंदे यांनी देखील अद्याप शिवसेनेच्या उमेदवारांचा निर्णय घेतलेला नाही.
Maharashtra | BJP releases the list of candidates for bye-election to the Legislative Council
महत्वाच्या बातम्या
- Election Commission : निवडणूक आयोगाकडून मतदार ओळखपत्र आधारशी जोडण्याची तयारी सुरू
- साखर कारखान्यांच्या निवडणुकीत पवारांची “खेळी”; मुलीला “सेफ” ठेवून पुन्हा नातवाचाच राजकीय बळी!!
- Baloch Liberation : बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानवर केला आणखी एक मोठा हल्ला
- AI : एआय अन् ड्रोनच्या मदतीने महिलांवर लक्ष ठेवत आहे इराण