विशेष प्रतिनिधी
मुंबई : बदलापूरच्या घटनेवरून शिंदे – फडणवीस सरकारला खिंडीत गाठण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस यांनी उद्या महाराष्ट्र बंद करायचे ठरवले होते. परंतु मुंबई हायकोर्टाने ठाकरे + पवार आणि काँग्रेस यांना जोरदार दणका देते उद्याचा संभाव्य महाराष्ट्र बंद बेकायदेशीर ठरविला. इतकेच नाही, तर उद्या कुठल्याही राजकीय पक्षाने बंद करायचा ठरवला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश हायकोर्टाने शिंदे – फडणवीस सरकारला दिले. हायकोर्टाच्या आदेशाची आम्ही अंमलबजावणी करू, असा निर्वाळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंतर दिला. Maharashtra bandh has been declared illegal
महाविकास आघाडीने एकत्र येऊन उद्याच्या महाराष्ट्र बंदची हाक दिली होती त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काल आणि आज सलग दोन पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र बंदचा सगळा कार्यक्रम पत्रकारांना सांगितला होता त्यानुसार उद्या दुपारी 2.00 वाजेपर्यंत महाविकास आघाडीचे नेते महाराष्ट्र बंद करणार होते.
पण मुंबई हायकोर्टात महाराष्ट्र बंदच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने या प्रकरणात महत्त्वाचे निर्देश दिले. कोर्टाचे हे आदेश महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का देणारे ठरले. कोर्टाच्या आदेशानंतर आता महाविकास आघाडीचे नेते काय निर्णय घेतात??, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंबई हायकोर्टाने काय म्हटलं?
कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर तसा कुणी प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने सरकारला दिले. महाधिवक्ता देवेंद्रकुमार ऊपाध्याय आणि अमित बोरकर यांच्या खंडपीठाचे हे आदेश दिले आहेत. कोर्टाचा हा आदेश महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांना धक्का देणारा आहे. तरीही महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं तर राज्य सरकार आणि विरोधक यांच्यात तणाव वाढण्याची शक्यता आहे.
Vinesh Phogat : विनेश फोगटने दिल्ली पोलिसांवर केला ‘हा’ मोठा आरोप!
महाविकास आघाडीला नोटीस
मुंबई हायकोर्टाच्या या आदेशानंतर आता मुंबईत पोलीस सतर्क झाले आहेत. पोलिसांकडून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना नोटीस जारी करण्यात येत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलीस लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे पोलिसांकडून कदाचित काही कार्यकर्त्यांची धरपकड देखील केली जाऊ शकते. तशी शक्यता नाकारता येत नाही. अर्थात या प्रकरणी काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आमचे शांततेत आंदोलन : चव्हाण
मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी लोकशाहीमध्ये आम्हाला आमचं म्हणण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आम्ही शांततेत आंदोलन करणार आहोत, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. चव्हाण यांच्या या प्रतिक्रियेवर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली. विरोधकांना आता राजकारण करायचं आहे. बदलापूरची घटना वाईट आहे. आरोपीवर कारवाई होत आहे. विशेष म्हणजे मुंबई हायकोर्टाने आदेश दिल्यानंतरही विरोधक त्या आदेशाला जुमानत नसल्याचा आरोप दरेकर यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरे यांचं महाराष्ट्र बंद विषयी नेमकं आवाहन काय?
सर्वांना सांगतो उद्या दुपारी 2.00 वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळा. सरकारच्या कारभारावर चिंता व्यक्त करत आहोत हे सरकारला दाखवून द्या. काही पेपरमध्ये बातम्या आल्या आहेत. शाळेतील मुख्याध्यापिकेने प्रश्न केला की या जखमा सायकल चालवल्याने झाल्या असतील. कोर्टानेही काल बदलापूर प्रकरणावर ताशेरे ओढले आहेत. रोज घटना घडत आहे. १३ ऑगस्टला बदलापूर,. १५ पुणे, २० ऑगस्ट लातूर, नाशिक, पुणे, मुंबई, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये या घटना घडल्या आहेत. सरकारला आरसा दाखवत आहे. एवढं सर्व चालू असताना एवढं निर्ढावलेपणे बहिणीची किंमत पैशात करत असाल तर बहिणीच्या नात्याला कलंक लावू नका. बहिणीचं रक्षण करा. सुरक्षित बहीण फार महत्त्वाचं आहे. बातम्या वाचून संतापाचा कडेलोट होतोय, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत मांडली.
Maharashtra bandh has been declared illegal
महत्वाच्या बातम्या
- Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील फार्मा कंपनीच्या प्लांटमध्ये भीषण स्फोट, 15 ठार, 40 जखमी
- Lakda shetkari Yojana : लाडक्या बहिणींच्या पाठोपाठ महाराष्ट्रात लाडका शेतकरी योजना; मुख्यमंत्र्यांची घोषणा!!
- Madhya Pradesh : ‘या’ राज्यातील राज्यसभा निवडणुकीच्या तारखांमध्ये झाला बदल!
- Champai Soren : चंपाई सोरेन यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची केली घोषणा!