• Download App
    महाराष्ट्र बंद- कुठे काय घडले पहा | Maharashtra Band- Pune Banglore national highway blocked

    महाराष्ट्र बंद- कुठे काय घडले पहा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : उत्तर प्रदेश मधील लखमिपुर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. आशिष मिश्रा (केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचे चिरंजीव) यांची गाडी अंगावर गेल्याने चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप झाला होता. याचा निषेध म्हणून हा बंद पुकारण्यात आला आहे.

    Maharashtra Band- Pune Banglore national highway blocked

    या बंद संदर्भात महाराष्ट्रातील निरनिराळ्या गावांमधील घटना व प्रतिसाद.

    काल मध्यरात्री सुरू झालेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. बऱ्याच जिल्ह्यातील दुकाने व आस्थापना बंद आहेत. स्थानिक बस सेवा बंद होत्या. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमधील लोकल ट्रेन सेवा सुरु आहे. कोल्हापूरमध्ये पुणे बंगळूर नॅशनल हायवेवर शिवसेना कार्यकर्त्यांनी रस्ता बंद केला होता पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. चेंबूर व मुंबई येथे पण शिवसैनिकांनी रस्ता अडवण्यासाठी प्रयत्न केला.


    Bharat Bandh : शेतकरी आंदोलकांच्या “भारत बंद”साठी उद्या महाराष्ट्रात काँग्रेस उतरणार रस्त्यावर!


    कॉंग्रेस कार्यकर्ते राजभवनाबाहेर ११ वा. मौन व्रत पाळणार आहेत. सोलापूर मधील चौकात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. काल रात्री पासून बेस्टच्या आठ बसेस वर दगडफेक झाली. प्रवक्ता म्हणाला की, आम्ही वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पोलिस संरक्षण मागितले आहे. प्रवक्ता म्हणाला की, खुप कमी प्रमाणात आज बस सेवा चालू आहे.

    पुण्यातील घाऊक व्यापारी व फळबाजार व्यापाऱ्यांनी बंद पाळला आहे. रिक्षा युनियननी पाठिंबा म्हणून रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु एस.टी बस सेवा दुपारी बारा नंतर सुरू होणार आहे. मुंबईत हिंदमाता, दादर, लालबाग, परळ येथील मार्केट बंद होते. नवी मुंबई व नाशिक मधील एपीएमसी मार्केट बंद होते.

    Maharashtra Band- Pune Banglore national highway blocked

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !