प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड गाजलेल्या राज्य सहकारी बँक घोटाळ्यानंतर बँक 380 कोटींच्या नफ्यात आहे आणि त्यामध्ये आधीच्या फडणवीस सरकारचे योगदान मोठे आहे, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली. त्यामुळे अर्थातच राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीची चर्चा सुरू झाली आहे. Maharashtra Assembly Session devendra fadnavis says state coorperationband
पण त्याच वेळी राज्य सहकारी साखर कारखाना विक्रीची गैरव्यवहार या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार तोफा डागल्या. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना तुमचे उत्तर सुधारा, असे सुनावले. त्याच वेळी अजितदादांना सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीत गैरव्यवहार तपासूनच पहा, असे आव्हान दिले. पण एकूण देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांच्यातले “विशिष्ट राजकीय संबंध” हा विधानसभेतला चर्चेचा विषय ठरला. एबीपी माझा वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.
– 25 हजार कोटींचा घोटाळा
सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी केला होता. अण्णा हजारे यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांना पत्र लिहून चौकशीची मागणी देखील केली होती. हे गैरव्यवहार प्रकरण विधानसभेत गाजले. त्यावेळी अजित पवार – देवेंद्र फडणवीस आमनेसामने आल्याचै चित्र पाहायला मिळाले.
– अण्णा हजारेंना खोटे ठरवू नका
राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, अण्णा हजारे यांनी 25 जानेवारी 2022 रोजी जी मागणी केली. त्याचे पत्र आमच्याकडे आले नाही, त्यावर देवेन्द्र फडणवीस म्हणाले, अण्णा हजारेंना खोटे ठरवू नका, उत्तर सुधारा. अण्णा हजारे यांनी पत्र लिहले हे सर्वांना माहिती आहे आणि हे सरकारला माहिती नाही म्हणजे सरकार झोपले आहे का? असा सवाल फडणवीसांनी विधानसभेत केला.
– ऑक्शन प्राईस नुसार विक्री
बाळासाहेब पाटील म्हणाले, अण्णा हजारे यांनी हे प्रश्न वारंवार उपस्थित केले आहेत. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, अण्णा हजारे यांची तक्रार बाजूला ठेवली तरी मूळ किंमतीपेक्षा कमी किंमतीत हे कारखाने विकले आहेत. यांची चौकशी होणार का? असा सवाल फडणवीसांनी केला आहे. त्यावर पाटील म्हणाले, ऑक्शन प्राईस ठरली, त्याप्रमाणे ही विक्री झाली आहे
– अण्णा हजारे यांचा आक्षेप
देवेंद्र फडणवीस म्हणाले, जे कारखाने विकले आहेत, त्याच्या जमिनीची किंमत जास्त आहे. जे कारखाने विकले त्यांच्यावर 100 कोटी रुपयांच कर्ज घेतले आहे. याचा अर्थ त्यांची किंमत जास्त आहे. अण्णा हजारे यांचा हाच आक्षेप आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले आहे. अजित पवार म्हणाले, या प्रश्नावर अनेकदा चर्चा झाली. गरज नसताना यावर गैरसमज करत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अण्णा हजारे आणि राजू शेट्टी यांनी तुमच्याकडे आणि राज्यपाल आणि इतर ठिकाणी तक्रार केली. त्यानंतर तुम्ही चौकशीचे आदेश दिले होते. यात एसीबी, सीआयडी आणि माजी न्यायाधीश यांच्या अंतर्गत चौकशी झाली. देवेंद्र फडणवीस साहेब, यात तुमचा गैरसमज झाला आहे. इथे अनेकजण कारखाने चालवत आहेत. ज्याला कारखाने चालवायचा असेल त्यांनी जा आणि कारखाने चालवा. आम्ही सोमेश्वर कारखाना चालवायला घेतला, आम्हाला तिथे 10 कोटी रुपये पहिल्या वर्षी तोटा झाला. ब-याच सदस्यांना याची माहिती नसते. भ्रष्टाचार झाला असा गैरसमज होतो. अनेक कारखान्यांची कोर्टाच्या निर्णयानंतर विक्री झाली आहे. मला नवल वाटतं की एकदा अण्णा हजारे यांना भेटावे आणि काय काय चौकशी झाली याची माहिती घ्यावी.
– अण्णांच्या पत्राची दखल घ्या
यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, अण्णा हजारे यांच्या पत्राची दखल घेतली पाहिजे. किसनवीर कारखाना अडचणीत आला कारण मदनदादा आमच्याकडे आले. त्यांना कर्ज देणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे कारखाना अडचणीत आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 5 कारखान्यांना हमी दिली. त्यानंतर एका ही कारखान्याला हमी देणार नाही अस सांगण्यात आलं. त्यानंतर एकाही कारखान्याला हमी दिली नाही. यावर पाटील म्हणाले, मी अण्णा हजारे यांना भेटून एसआयटी आणि जाधव कमिटीच्या अहवालाची माहिती देणार आहे
– आता सरकार हमी देत नाही
राज्यातील थकबाकीदार कारखान्यांबाबत देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, आता सरकार सहकारी साखर कारखान्यांना हमी देत नाही. जो-तो स्वतःच्या ताकदीवर कारखाना चालवत आहे. अनेक बँका कर्ज दिल्यामुळे आतापर्यंत अडचणीत आल्या होत्या.
– सहकारी बँकेचा नफा 380 कोटींवर
मात्र, सध्या राज्य सहकारी बँकेचा नफा 380 कोटींवर गेला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या नफ्यात फडणीस सरकारचेही योगदान आहे, हे सांगायला अजित पवार विसरले नाहीत. फडणवीस यांनी काही चांगली माणसे नेमली. त्याचा फायदा होताना दिसतोय, याचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.
Maharashtra Assembly Session devendra fadnavis says state coorperationband
महत्त्वाच्या बातम्या
- जुन्या वाहनांच्या नोंदणी प्रमाणपत्रांचे नूतनीकरणासाठी आठ पटीने जास्त खर्च; १५ वर्षांहून जुन्या वाहनांसाठी १ एप्रिल पासून नियम
- मनसेने काढली राऊतांच्या जखमेवरची खपली; शिवसेनेची गाडी पुन्हा करणार पलटी…!!
- ‘मी कोणत्या घरातून येतो हे ठाकरे-पवारांना माहिती नाही’ – फडणवीसांचा प्रहार
- Maharashtra Budget 2022 : 25 शिवसेना आमदारांच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे; तरी देखील बजेटमध्ये राष्ट्रवादीच पुढे…!!