• Download App
    बंडातात्यांसारख्या महात्म्यांची महाराष्ट्राला आणि देशाला गरज; मुख्यमंत्र्यांचा बंडातात्यांशी व्हिडिओ कॉलवरून संवाद Maharashtra and the country need great people like Bandatatya

    बंडातात्यांसारख्या महात्म्यांची महाराष्ट्राला आणि देशाला गरज; मुख्यमंत्र्यांचा बंडातात्यांशी व्हिडिओ कॉलवरून संवाद

    अक्षयमहाराज भोसले

    महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांच्या विचारांचा जागर महाराष्ट्रभर करणारे श्रद्धेय बंडातात्या कराडकर हे आमच्यासाठी सदैव पूज्य आहेत. त्यांनी आज पावेतो केलेली संत साहित्याची साधना व व्यसनमुक्त महाराष्ट्र चळवळ याची नोंद संपूर्ण महाराष्ट्राकडे आहे. त्यांना झालेला पक्षघाताचा त्रास यासाठी ते मागील काही दिवसांपासून पुणे येथे अत्यावश्यक उपचारांसाठी दाखल झाले आहेत. Maharashtra and the country need great people like Bandatatya

    तात्यांच्या उपचारांचे वृत्त मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांना समजताच क्षणी श्रद्धेय तात्या जितके समाजाचे तितकेच ते माझेदेखील आहेत, ही भावना मनाशी बाळगून साहेबांच्या वतीने मागील ३ दिवस स्वतः मुख्यमंत्री आरोग्य कक्ष प्रमुख मंगेश चिवटे हे मुंबई आणि नागपूरहुन प्रवास करत व्यक्तिगतरित्या भेट देऊन सुरू असणाऱ्या उपचारांवर लक्ष ठेऊन आहेत. काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी थेट व्हिडिओ कॉलद्वारेही तात्यांशी संवाद साधला. पू. तात्यांचा अनुयायी आणि परिवार वर्ग हा खूप मोठा आहे.


    शिंदे – फडणवीस यांच्या सकारात्मक शिष्टाईमुळे अंगणवाडी सेविका आणि वीज कर्मचाऱ्यांची आंदोलने मागे


    मात्र तात्या हे माझ्या कुटूंबाचा भाग आहेत. त्यांनी आजपवेतो धर्मरक्षणासहित समाजहितासाठी दिलेलं योगदान पाहता त्यांच्या उपचारासाठी मी व्यक्तिगत लक्ष देणे गरजेचे तसेच माझे कर्तव्य आहे, ही संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावना आहे. त्यांच्या उपचारांसाठी रूग्णालयाचा येणारा खर्च देखील त्यांच्या सर्व परिवाराचा आदर राखत आम्ही करणे हे माझे कर्तव्य आहे. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे देखील बंडातात्यांच्या उपचारांवर विशेष लक्ष आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने तात्यांच्या उपचारार्थ येणाऱ्या संपूर्ण खर्चाचा धनादेश मंगेश चिवटे यांनी व्यसनमुक्त युवक संघाकडे केवळ सेवा या भावनेने कुठेही चर्चा न करता सुपूर्दही केला. मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख राजाभाऊ भिलारे देखील प्रत्येक वेळी विशेष लक्ष देत उपस्थित आहेत.

    धर्मवीर आध्यात्मिक सेनेचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने आणि माझे तात्यांचे पारिवारिक सबंध असल्याने व्यक्तीगतरीत्या आम्ही देखील रुग्णालयातच बहुतांश वेळ उपस्थित आहोत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला व्यसनमुक्त युवक संघाचा प्रत्येक कार्यकर्ता तात्यांवर जीवापाड किती प्रेम करतो हे याची देही याची डोळा मी मागील अनेक दिवस अनुभवतोय . माझ्या सर्व गुरुबंधूंना आपण दाखवलेल्या संयम व शिस्तीबद्दल देखील विशेष आभार मानतो.

    मा. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या संवादात गुरुवर्य तात्यांनी नदी प्रदूषण रोखण्याबाबत विनंती केली. आपणा सर्वांना कळवू इच्छितो की यापूर्वीच मुख्यमंत्री महोदय यांनी स्थापित केलेल्या धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या वतीने पंढरपूर आणि इतर तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी या बाबत कार्यवाही देखील सुरू झाली आहे. कारण मुख्यमंत्री महोदयांना भाविकांचे व वारकऱ्यांचे हित महत्वाचे वाटते. तात्या लवकरच बरे होऊन आपल्या सर्वांच्यात पुन्हा एकदा कीर्तन भजनाचा आनंद घेताना दिसतील. महाराष्ट्राला इतका संवेदनशील व वारकऱ्यांचा हक्काचा मुख्यमंत्री भेटला हे विशेष. पुनःश्च एकदा त्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो.

    (प्रदेशाध्यक्ष : धर्मवीर अध्यात्मिक सेना)

    Maharashtra and the country need great people like Bandatatya

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Thackeray -Pawar : ऐक्य + बैठकांच्या कोरड्या बातम्या; प्रत्यक्षात भाजप प्रणित सरकारला धक्का लावता येत नसल्याच्या निराशा!!

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!