• Download App
    Maharashtra 500 Cities - in village Balasaheb Thackeray our clinics

    सामान्यांसाठी आरोग्याची बातमी; महाराष्ट्रात 500 शहरे – गावांत बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना!!

    प्रतिनिधी

    मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारने सत्ता हातात घेतल्यानंतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मुंबईत आपला दवाखाना ही संकल्पना सुरू केली. ती यशस्वी होत आहे. आता हीच संकल्पना महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये अमलात आणण्याचे सरकारने ठरवले असून सुरुवातीला 500 शहरे आणि गावांमध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला जाणार आहे. Maharashtra 500 Cities – in village Balasaheb Thackeray our clinics

    मुंबई बरोबरच महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्यातील प्रत्येक तालुक्यात आणि शहरी भागात, असे एकूण 500 ठिकाणी आपला दवाखाना सुरू केले जातील, असे त्यांनी सांगितले. राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना स्थापन करण्याबाबत कार्यक्रम झाला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे हा कार्यक्रम झाला.



     

    मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईपाठोपाठ राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी आपला दवाखाना सुरू होणार असून सुमारे 500 ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्यात येईल. मुंबईत सुरू केलेल्या दवाखान्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. घराजवळ असलेल्या दवाखान्यामुळे लगेच उपचार मिळायला सुरू झाले. त्यामुळे मुंबईतील ही संकल्पना राज्यातील तालुक्यात विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने राज्यातील रेल्वेचे प्रकल्प, नगर विकास विभागाचे विविध प्रकारच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. मुंबई शहराला आणखी विकसित करण्यावर भर दिला जात आहे, असे त्यांनी सांगितले.

    Maharashtra 500 Cities – in village Balasaheb Thackeray our clinics

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!