सखोल संशोधनानंतर यासंदर्भात मूळ दस्तऐवज उघड करण्यात आले.
प्रतिनिधी
सातारा: छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या कुलमुखत्यार आणि पराक्रमी स्त्री म्हणून इतिहासात नोंद असणाऱ्या महाराणी येसूबाई यांची समाधील अखेर सापडली आहे. साताऱ्यातील माहुली येथे ही समाधी असल्याचे पुरावे मिळाले आहेत. Maharani Yesubai’s tomb was found at Mahuli in Satara
महाराणी येसूबाई यांच्या समाधीचा शोध घेण्याचे काम अनेक वर्षांपासून सुरू होते. येथील हरिनारायण मठाच्या इसवी सन १७५६ मधील ऐतिहासिक कागदपत्रावरून हा शोध लागला आहे. खरंतर महाराणी येसूबाई यांच्या समाधीबाबत गेली अनेक वर्षे साशंकता व्यक्त केली जात होती.
महिलांना आजपासून एसटी ५० % सवलतीचे तिकीट; करा सर्व प्रकारच्या गाड्यांमधून निम्म्या भाड्यात प्रवास
सखोल संशोधनानंतर यासंदर्भात मूळ दस्तऐवज गुरुवारी साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत उघड करण्यात आले. या ठिकाणी दगडी वृंदावन आणि घुमटी असल्याचे समोर आले आहे. यामुळे आता समाधीचे पुनरुज्जीवन करण्याच्या कामाला गती मिळणार आहे. येसूबाई फाउंडेशन चे संस्थापक सुहास राजेशिर्के आणि जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्थेचे निलेश पंडित यांच्या उपस्थितीत ही माहिती देण्यात आली.
संगम माहुली गावात एक मोठा दगडी चौथरा आहे या चौथ्यावर छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नीचा सगुणाबाई यांचे वृंदावन आणि त्याच्या पाठीमागे सगुणेश्वराचे देवालय आहे. सगुणाबाईंचा मृत्यू २५ जुलै १७४८ रोजी झाला. या समाधीच्या पुढील बाजूस कृष्णा वेण्णामाईची रथ शाळा आहे. या रथ शाळेला लागूनच पूर्वाभिमुख अवाढव्य एक दगडी बांधकाम दिसते. हे दगडी बांधकाम म्हणजेच स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांचे समाधी स्थळ आहे. ही समाधी स्थळ २० फूट उंच आणि १० फूट रुंद आहे. या इमारतीवर राजघराण्याशी संबंधित अशी राजचिन्हे कोरण्यात आली आहेत.
Maharani Yesubai tomb was found at Mahuli in Satara
महत्वाच्या बातम्या
- CJI म्हणाले- कायदेशीर चर्चेत वापरल्या जाणार्या अयोग्य लैंगिक शब्दांवर बंदी घालण्यात येईल, नवीन शब्दकोश लवकरच येणार
- अदानी – अंबानींना टार्गेट करून काँग्रेसचे राजकीय भांडवली मूल्य कसे काय वाढेल??
- Coronavirus : करोनाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्राने पाठवले सहा राज्यांना पत्र!
- योगी सरकराच्या सहा वर्षांमध्ये उत्तर प्रदेशात ६३ गुन्हेगारांचा खात्मा; ५ हजारांहून अधिकांच्या मुसक्या आवळल्या!