विशेष प्रतिनिधी
पुणे : पंतप्रधान म्हणून देशाचे पालक म्हणून काम करायचे ते क्षुद्र राजकारणासाठी महाराष्ट्राचा द्वेष करत आहेत. आपल्या महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. त्यांना सद्बुद्धी देऊन रयतेचे कल्याण करण्यासाठी प्रेरीत करा. खरा राजधर्म शिकण्याची संधी देण्यासाठी माफ करा असे गाऱ्हाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवाजी महाराज यांच्यापुढे मांडण्यात आले .Maharaj, NCP’s agitation saying forgive Modi
मोदी यांचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आलेअर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘महाराष्ट्राने देशात कोरोना पसरवला’ असे विधान केले. त्यांच्या या विधानाचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीचा नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या मनात कायमच द्वेष राहिला आहे. त्यामुळेच ते या भूमीचा कायमच अपमान करीत आले आहेत. महाराष्ट्रातील भाजपचे नेतेही नरेंद्र मोदींच्या गुलामगिरीत गुंग असल्याने त्यांनाही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी काहीही देणेघेणे नाही. महाराष्ट्रातील, देशातील जनता येत्या काळात भाजपला धडा नक्की शिकवणार अशी संतप्त भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.
दिपाली धुमाळ, प्रवक्ते प्रदीप देशमुख मृणालिनी वाणी, किशोर कांबळे, शशिकला कुंभार, कार्तिक शिंदे, पूनम पाटील , सुवर्णा सावर्डे, किरण कद्रे, श्वेता मिस्त्री, प्रीती धोत्रे, राखी श्रीराव, सानिया झुंजारराव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Maharaj, NCP’s agitation saying forgive Modi
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : अखेर नितेश राणे यांना दिलासा, संतोष परब हल्लाप्रकरणी 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर राणेंना जामीन मंजूर
- Hijab Controversy : हिजाबच्या वादात नोबेल विजेत्या मलालाची एन्ट्री, भारतीय नेत्यांना केले हे आवाहन
- इतरांच्या घरात घुसण्याची भाषा करता, संजय राऊत, तुमची घरातली किंमत खलिता वाहणाऱ्या काशिदाची!!; आमदार अमित साटमांचा हल्लाबोल
- हिंदीमध्ये वैद्यकीय अभ्यास : एमबीबीएस प्रथम वर्षात तीन विषयांसह सुरू, मध्यप्रदेशातील गांधी वैद्यकीय महाविद्यालय पहिली संस्था वृत्तसंस्था