विशेष प्रतिनिधी
मुंबई : 2029 ची लोकसभा निवडणूक बारामती लोकसभा मतदारसंघातून लढवणार आहे, अशी घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी केली. अकोला जिल्ह्यातील बाळापूर या ठिकाणी ते एका कार्यक्रमात बोलत होते. जानकर यांचा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघातून परभाव झाला होता. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय जाधव यांनी त्यांचा मोठा मतांनी पराभव केला होता. या पराभवाचे कारण देखील जानकर यांनी सांगितले.Mahadev Jankar’s announcement – Will contest next Lok Sabha from Baramati, lost in Parbhani due to Muslim-Dalit opposition
मुस्लिम, दलित विरोधात गेल्याने पराभव
परभणी लोकसभा मतदारसंघात आपला पराभव हा मुस्लिम आणि दलित मतदार विरोधात गेल्याने झाल्याचेही जानकर यांनी सांगितले. परभणी लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर हे महायुतीकडून निवडणूक लढले होते. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव हे होते. तर वंचित बहुजन आघाडूकडून हवामान अभ्यायासक पंजाबराव डख हे देखील निवडणुकीच्या मैदानात होते. या निवडणुकीत संजय जाधव यांनी मोठ्या मताधिक्याने महादेव जानकर यांचा पराभव केला होता.
सुरुवातीला माढा लढवण्याची होती चर्चा
यावेळच्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकरांनी माढा लोकसभा मतादरसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या पक्षाची जागा जानकर यांना सोडल्याचे जानकरांनी देखील कबुल केले होते. मात्र, अचानक जानकरांनी फडणवीसांची भेट घेत आपण महायुतीकडूनच निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर महादवे जानकरांना महायुतीकडून परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले होते.
पीक विमा कंपन्यांना काळ्या यादीत टाका
अकोला जिल्ह्यात पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कम देण्यात आली आहे. यावर बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी कंपन्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा इशारा दिला आहे. या कंपन्यावर केसेस केल्या तरच या कंपन्यांच्या चालकांचे डोके ताळ्यावर येईल, असेही ते म्हणाले.
Mahadev Jankar’s announcement – Will contest next Lok Sabha from Baramati, lost in Parbhani due to Muslim-Dalit opposition
महत्वाच्या बातम्या
- लक्ष्मण हाके म्हणाले- पवारांकडून माझे तिकीट फायनल होते पण नंतर काय झाले हे त्यांनाच ठाऊक
- विधानसभेसाठी महायुतीची तयारी; फडणवीसांनी प्रवक्त्यांचे टोचले कान, 200 जागा जिंकण्याचे गणितही सांगितले
- हातरस घटनेतील आरोपी देव प्रकाश मधुकर याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
- आसाममध्ये पुराचा कहर, 24 लाखांहून अधिक लोक बाधित, अनेकांचा मृत्यू!