मुंबई : Mahadev Jankar alleges : मतचोरीचा मुद्दा भाजपची पाठ सोडताना दिसत नाही. राहुल गांधी यांनी सुरुवातीला भाजपावर मतचोरीचे आरोप केले. लोकसभा निवडणुकीत आणि महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेत मोठ्या प्रमाणात मतचोरी झाल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी रान उठवले होते. अशातच पूर्वी भाजपसोबत असणाऱ्या महादेव जानकर यांनी देखील आता भाजपवर मत चोरीचे आरोप केले आहेत.
कोणत्याही निवडणुका झाल्या की पराभूत पक्ष मतदान यंत्रात घोळ असल्याचा किंवा मतदान प्रक्रिया बरोबर नसल्याचा आरोप करतात यात काही नवल नाही. पण आता काँग्रेस सह इतर स्थानिक पक्ष देखील मत चोरी झाल्याचा आरोप करत असतानाच पूर्वी भाजपसोबत असणारे, भाजपचे जुने सहकारी महादेव जानकर यांनी देखील भाजपावर मत चोरीचा आरोप केला.
महादेव जानकर हे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आहेत. 2014 पासून ते एनडीए आघाडी सोबत होते. त्यांनी बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवून सुप्रिया सुळे यांना चांगलीच टक्कर दिली होती. त्यानंतर ते भाजपच्या सहकार्याने विधान परिषदेचे आमदार राहिले आहेत. 2014 ते 2019 या काळात ते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात दुग्ध विकास मंत्री देखील होते. मात्र 2019 नंतर यांच्या वाट्याला कोणतेही पद आले नाही.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत ते इंडिया आघाडी सोबत होते. त्यांनी भाजपच्या चिन्हावर परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्यात त्यांचा पराभव झाला. सुरुवातीला ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून माढ्यातून निवडणूक लढवतील अशी शक्यता निर्माण झाली होती मात्र त्यांनी अनापेक्षित पणे भाजपसोबत जात परभणीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान केंद्रात आणि राज्यात मत चोरी करून भाजप सत्तेवर आल्याचा आरोप माजी मंत्री महादेव जानकर यांनी केला. यवतमाळ येथे एका सभेत बोलत असताना त्यांनी हे आरोप केले. देशात लोकशाही वाचवायचे आणि टिकवायचे असेल तर ईव्हीएम आयोजित बॅलेट पेपरवर मतदान घेणे गरजेचे आहे असे जानकर यावेळी बोलताना म्हणाले. त्यांनी उदाहरणादाखल अक्कलकोट मधील रासपच्या उमेदवाराला त्याच्या गावातूनच शून्य मतदान मिळाल्याचा दाखला दिला.
राज्यात चालू असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले. सर्व समाजाला आरक्षण केंद्र सरकारने दिले पाहिजे असे ते म्हणाले. येत्या 28 सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विधानभवनावर मोर्चा काढणार असल्याची जाणकार यांनी यावेळी सांगितले.
BJP came to power by stealing votes; Former Minister Mahadev Jankar alleges
महत्वाच्या बातम्या
- Subrata Roy’ : सुब्रत रॉय यांच्या मुलाला ईडीने फरार घोषित केले, 1.74 लाख कोटींच्या घोटाळ्यात सहाराविरुद्ध आरोपपत्र
- Vice Presidential election : राहुल गांधी आणि विरोधकांचा मतचोरीच्या मुद्द्यावरून बाहेर बवाल; पण विरोधकांपुढे खासदारांचे संख्याबळ टिकवण्याचे खरे आव्हान!!
- Hockey Asia Cup : भारताने चौथ्यांदा हॉकी आशिया कप जिंकला, अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाचा 4-1 असा पराभव
- Adani Group : अदानी ग्रुप 2032 पर्यंत 5.34 लाख कोटींची गुंतवणूक करणार, अक्षय ऊर्जा आणि ट्रान्समिशनवरही फोकस