प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीच्या महामोर्चाच्या गर्दीत भगवी लाट चर्चेत आली आहे. कारण महामोर्चा जरी महाविकास आघाडीचा असला तरी अजेंडा राष्ट्रवादीचा आणि गर्दी शिवसेनेची असे चित्र दिसले आहे. Maha Vikas Aghadi Power Demonstration in Mumbai
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, समाजवादी पक्ष, रिपब्लिकन पक्ष, संभाजी ब्रिगेड, मराठा ठोक मोर्चा, शिवसेनेला पाठिंबा देत असलेला कम्युनिस्ट पक्ष आणि बाकीच्या अनेक संघटना या महामोर्चात सहभागी झाले आहेत. पण सर्वाधिक झेंडे मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे भगवे दिसत आहेत.
या महामोर्चाचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड आदी नेत्यांनी केले आहे. सुमारे 3.5 किलोमीटरच्या या मोर्चात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. पण या सगळ्यात शिवसेनेच्या भगव्या लाटेची चर्चा अधिक आहे. कारण या गर्दीतली बहुसंख्या ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जमवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस रिपब्लिकन पार्टी यांचे तिरंगी झेंडे, निळे अधून मधून या भगव्या लाटेतून डोकवत आहेत.
शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन
शिवसेनेतील उभ्या फुटी नंतर जरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राज्यभर महाप्रबोधन मेळावे घेतले असले, तरी शिवसेनेच्या शक्तीचे नाक म्हणून मुंबईकडेच पाहिले जाते. त्यामुळे मुंबईत आपल्या पक्षाचे सर्वात जोरदार प्रदर्शन करण्याची तयारी या महामोर्चाच्या निमित्ताने शिवसेनेनेच केली होती आणि त्याचेच परिणाम आजच्या मोर्चामध्ये भगव्या लाटेच्या रूपात दिसले आहेत.
227 प्रभागांमधून 454 बसची गर्दी
शिवसेनेने मुंबईतल्या 227 प्रभागांमध्ये प्रभागांमधून प्रत्येकी 2 म्हणजे 454 अशा बस गाड्यांमधून भरून आपले समर्थक शिवसैनिक या मोर्चासाठी आणले आहेत. त्यामुळे अर्थातच महाविकास आघाडीच्या मोर्चावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सर्वाधिक छाप आहे. तसेही महामोर्चाच्या निमित्ताने शिवसेनेला आपले शक्तिप्रदर्शन करून घ्यायचे होतेच. ते शक्तिप्रदर्शन शिवसेनेने महाविकासातील सर्व घटक पक्षांमध्ये सर्वात जास्त संख्येने कार्यकर्ते जमवून मुंबईत करून घेतले आहे.
Maha Vikas Aghadi Power Demonstration in Mumbai
महत्वाच्या बातम्या
- महामोर्चा आघाडीचा; अजेंडा राष्ट्रवादीचा; जास्तीत जास्त गर्दी जमवण्याची जबाबदारी शिवसेनेची; काँग्रेस, समाजवादी पक्ष “मम” म्हणायला!!
- महामोर्चाच्या परवानगी वरून महाविकास आघाडीचा बवाल, पण मोर्चाला पोलिसांची परवानगी
- भारत जोडो यात्रेचे 100 दिवस पूर्ण; सावरकर टीआरपीच्या सावटाखाली धुगधुगती लिबरल आशा
- JEE Main 2023 परीक्षा जानेवारीत; करा अर्ज; ‘या’ आहेत महत्त्वाच्या तारखा
- फ्रॅक्चर्ड फ्रीडमचा वाद; विडंबनाचा घाव; कुणी भाव देत का रे? भाव?