प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात महापुरुषांबाबत होत असलेली वक्तव्ये आणि राज्यातील इतर प्रश्नांवर महाविकास आघाडीतले घटक पक्ष आज महामोर्चा काढणार आहेत. या मोर्चात गर्दी जमवण्यासाठी प्रत्येक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना प्रत्येकी 2 बसेस भरून कार्यकर्त्यांना घेऊन येण्याचे आवाहन नेत्यांनी केले आहे. Maha Vikas Aghadi Mahamorcha
त्यानुसार मुंबईतील प्रभागांमधून प्रत्येकी 2 बसेस भरून कार्यकर्त्यांना भायखळा येथील रिचडसन क्रुडासपर्यंत आणण्याच्या सूचना तिन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी केल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी गर्दीची जमवा जमव करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात या मोर्चात नेमकी गर्दी किती?, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. मोर्चातल्या संख्येबद्दल दोन्ही पक्षांकडून वेगवेगळे दावे करण्यात येणार आहेत.
मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी काही अटींच्या आधारे मोर्चाला लेखी परवानगी दिली आहे.
हल्लाबोल महामोर्चासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी तयारी केली आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण रस्त्यात तिन्ही पक्षांकडून बॅनरबाजी केली आहे.
भायखळा ते टाइम्स बिल्डिंगपर्यंत 3.5 किलोमीटरचे हे अंतर आहे. गाडीतून प्रवास केल्यास हे अंतर कापायला १५ मिनिटांचा अवधी लागतो. हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. पोलिसांचाही चोख बंदोबस्त असेल. त्यामुळे पायी जाताना हे अंतर कापायला साधारण ३०-३५ मिनिटांचा कालावधी महाविकासआघाडीच्या नेत्यांना लागू शकतो,असा अंदाज आहे.
मोर्चात समाजवादी पक्ष आणि इतर पक्षही सामील होणार आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच समाजवादी पक्षांचे ज्या भागांमध्ये नगरसेवक आहेत, त्या भागांमधून प्रत्येकी 1 किंवा 2 बसेस भरुन आणण्याची जबाबदारी संबंधित नगरसेवकाची असेल तर, ज्या भागांमध्ये या तिन्ही पक्षांचे नगरसेवक नसतील त्या भागांमध्ये ज्या पक्षांचे प्राबल्य असेल तिथे त्या पक्षाच्या तालुका अध्यक्षांना 2 बसेस भरुन आणण्याच्या सूचना केल्या आहे.
मुंबईतील २२७ प्रभागांमधून प्रत्येकी 1 ते 2 बसेस भरुन कार्यकर्ते या मोर्चाला आणण्याच्या प्रमुख सूचना असून याव्यतिरिक्त मग इतर शहरांमधून कार्यकर्तेही आणले जाणार आहेत.
मुंबईत मोर्चाची विशाल गर्दी दिसून यायला हवी म्हणून शिवसेनेने आपल्या प्रत्येक शाखेतून प्रत्येकी ५० ते १०० शिवसैनिक या मोर्चाला उपस्थित राहावेत अशा सूचना दिल्या आहेत.
विशेष म्हणजे शिवसेना आणि काँग्रेसने दक्षिण मुंबईतील भागांमधूनच अधिकाधिक कार्यकर्ते जमविण्यावर भर दिला आहे. त्यामुळे दक्षिण व दक्षिण मध्य मुंबईतील सेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर गर्दी जमवण्यावर अधिक भर असल्याची माहिती मिळत आहे.
Maha Vikas Aghadi Mahamorcha
महत्वाच्या बातम्या