प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्रात सध्या शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसोबतचे जे सरकार बनले आहे, त्याचे बाळासाहेबांचे नक्कीच समर्थन असते. कारण बाळासाहेबांनी अनेकदा शरद पवार यांच्यासोबतच व्यासपीठ शेअर केले आहे. बाळासाहेबांनी अनेकदा सांगितले होते की, राष्ट्रवादीची ताकद आणि शिवसेनेची ताकद एकत्र आली, तर आपण दिल्लीला वाकवू शकतो. त्यामुळे आता जे काही सरकार स्थापन झाले आहे, ते एकेकाळचे बाळासाहेबांचे स्वप्न होते, बाळासाहेबांची तशी भूमिका होती, असा खळबळजनक दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुण्यातल्या एका मुलाखतीत केला आहे. Maha Vikas Aghadi government is Balasaheb’s dream
संजय राऊत आणि शरद पवार यांची संयुक्त मुलाखत चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी घेतली या मुलाखतीत संजय राऊत यांनी हा दावा केला आहे.
पुण्यात वसंत दादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटमधील साखर परिषद 2022 नंतर आमदार रोहित पवार यांनी कनेक्ट महाराष्ट्र हा उपक्रम घेतला या उपक्रमात ही मुलाखत झाली आहे. यामध्ये संजय राऊत यांनी अनेक दावे केले आहेत.
– संजय राऊत म्हणाले :
आता जे कुणी गैरसमज निर्माण करत आहेत. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा अभ्यास केला पाहिजे. मी त्यांची शिकवणी घ्यायला तयार आहे. असे सरकार होण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले होते. पण भाजपचे आभार मानले पाहिजे की त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील सरकार आणण्यासाठी मदत केली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मी ३० वर्षे काम केले आहे, त्यांचा प्रभाव माझ्यावर आहेच. बाळासाहेब होते तेव्हा सामनामधून किंवा अन्य माध्यमातून बाळासाहेबांच्या वतीने मीच उत्तरे देत होतो. आताही आमचा पक्ष मोठा असला तरीही एखाद्या विषयावर हिमतीने बोलण्यासाठी जेव्हा मी उभा राहतो तेव्हा बाळासाहेबांची आठवण होते. तेव्हा बाळासाहेबांनी मला काय सांगितले असते, असा विचार येतो. अजूनही तुम्ही सामानाचे अग्रलेख वाचाल, तेव्हा ते बाळासाहेबांचेच विचार वाटतात, म्हणून ते अनेकांना भावतात, आज बाळासाहेब असते, तर भाजपचे उद्योग
करण्याची हिंमतच झाली नसती.
भाजपच्या नेत्यांना बाळासाहेबांसमोर चळाचळा कापताना आम्ही पाहिले आहे. मातोश्रीत पाऊल टाकण्यासाठी १० वेळा विचार करायचे, परिस्थिती अजूनही बदलली नाही.
आम्ही जर म्हटले आम्हाला काही गोष्टी दाखवायच्या असतील, तर दाखवू शकतो. पण आमचे सध्याचे नेते सुसंस्कृत आहेत, आम्ही बाळासाहेबांच्या पठडीत तयार झाले आहोत, त्यामुळे आम्ही सुसंस्कृतपणा मानत नाही, अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, तुम्ही ज्या भाषेत बोलाल, त्या भाषेत आम्ही उत्तर देऊ. आमची भाषा ठाकरी आहे.
Maha Vikas Aghadi government is Balasaheb’s dream
महत्वाच्या बातम्या
- आयसीसीआर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचा जगभरात वाजणार डंका!!
- राज्यसभा निवडणूक : हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची 3 मते भाजपला?? ठरणार का गेम चेंजर??
- कानपूर हिंसाचार : सीएम योगींनी रात्री उशिरा बोलावली बैठक, म्हणाले- कंटकांवर लागणार गँगस्टर, मालमत्तेवर चालवणार बुलडोझर
- सुप्रिया सुळे : तुळजापुरातलं नवसाचं मुख्यमंत्रिपद पुण्यात येताच ताटातलं वाटीत आलं!!