Health Minister Rajesh Tope : कोरोना महामारीची दुसरी लाट हळूहळू ओसरत असली तरी तिचा प्रभाव अद्यापही कायम आहे. राज्य सरकारनेही लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता आणून नियमावलीनुसार काही कामांना मुभा दिली आहे. आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लॉकडाऊनसंदर्भाने एक विनंती केली आहे. राजेश टोपे म्हणाले की, राज्यात एकतर कडक लॉकडाउन लागू करावा, नाहीतर पूर्णपणे सूट द्यायला हवी. Maha Health Minister Rajesh Tope Request To CM Thackeray on Lockdown in State
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोना महामारीची दुसरी लाट हळूहळू ओसरत असली तरी तिचा प्रभाव अद्यापही कायम आहे. राज्य सरकारनेही लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता आणून नियमावलीनुसार काही कामांना मुभा दिली आहे. आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लॉकडाऊनसंदर्भाने एक विनंती केली आहे. राजेश टोपे म्हणाले की, राज्यात एकतर कडक लॉकडाउन लागू करावा, नाहीतर पूर्णपणे सूट द्यायला हवी.
नव्या कोरोना बाधितांची संख्या काही दिवसांपासून कमी आढळत आहे. याशिवाय शाळा सुरू करण्यावरही सरकारचा विचार सुरू आहे. परंतु लॉकडाऊनमध्ये पूर्णपणे सूट दिलेली नसल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी आहे. थिएटर्स, नाट्यगृहे अजूनही बंदच आहेत. व्यापाऱ्यांनाही ठरावीक वेळेतच व्यवसाय करण्याची मुभा आहे. यामुळे राज्यातील लॉकडाउन हटवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा, अशी विनंती राजेश टोपे यांनी केली आहे.
राजेश टोपे म्हणाले की, जेथे कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत, तेथे निर्बंध लागू राहू द्यावे. पण जेथे कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी होत चालला आहे तेथे व्यापारासाठी पूर्णपणे परवानगी द्यावी. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अभ्यास करून आपला निर्णय लवकरच जाहीर करतील, असेही ते म्हणाले आहेत.
Maha Health Minister Rajesh Tope Request To CM Thackeray on Lockdown in State
महत्त्वाच्या बातम्या
- दक्षिण कश्मीरच्या अनंतनागमध्ये NIAची छापेमारी, ISISशी संबंधांवरून 6 जणांना अटक
- शिवसेना प्रवेशावर उज्ज्वल निकम यांनी केला खुलासा, आधी राऊत, मग एकनाथ शिंदेंच्या भेटीने चर्चांना उधाण
- राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, आगामी महापालिका निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात
- आसामच्या मुख्यमंत्र्यांचे सावरकरवादाकडे दमदार पाऊल…!!
- लष्करातील महिलाशक्ती काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात लढणार, आसाम रायफल्सच्या महिला सैनिकांवर जबाबदारी