– स्त्रीच्या बुद्धी, गुणवत्ता, अंतर्गत गुणांना महत्व द्या – योगिता साळवी
विशेष प्रतिनिधी
पुणे : शारदीय नवरात्रात सगळीकडे गुजराती गरब्याचे मार्केटिंग जोरदार झाले असताना महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यात मातृशक्ती संस्थेने मराठी परंपरा जपत ठिकठिकाणी भोंडल्यांचे आयोजन केले होते. त्याची सांगता महाभोंडल्याने झाली. या महाभोंडल्यामध्ये 800 महिला सहभागी झाल्या होत्या. Maha Bhondla for women in Pune
मुलगी सुरक्षित राहायची असेल तर तिला कायद्याचे ज्ञान द्या,मानसिक शारीरिक दृष्ट्या सुदृढ बनवा. सर्व स्त्रिया शक्तीदायिनीच आहेत.’असे उद्गार दै. तरुण भारतच्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी मातृशक्ती, पुणे आयोजित महाभोंडल्या च्या वेळी काढले.
मातृशक्ती, पुणे यांनी आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर महाभोंडल्याचे आयोजन केले होते. नवरात्र महोत्सवात मातृशक्ती, पुणे यांजकडून पुण्यातील विविध सेवा वस्त्या, सोसायट्या, शाळा येथे भोंडल्याचे आयोजन केले होते. त्याची सांगता आजच्या महाभोंडल्यानं झाली.
या प्रसंगी बोलताना प्रमुख पाहुण्या श्रीमती गिरीजा ओक म्हणाल्या,’ रिकामा सरफेस दिसला की त्यावर लगेच वस्तू जमा होतात.तसं बायकांचा रिकामा वेळ,हात असेल तर घरातील कामे त्या करत राहतात. स्त्रीने रिकामा वेळ उरला तर तो स्वतः साठी वापरला पाहिजे.
स्वदेश, स्वभाषा, स्वसंस्कृती,स्वधर्म आणि स्वत्व जपत प्रत्येक क्षेत्रात आजची स्त्री कार्यरत आहे. गरज आहे ती एकत्रित येणे, संघटित होऊन कृती करण्याची त्यासाठी आजच्या भोंडल्याचे आयोजन आहे असे प्रतिपादन सुजाता सातव यांनी त्यांच्या प्रास्ताविकात केले.
योगिनी टिळक यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, तर रुपाली केंढे यांनी आभार प्रदर्शित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले. त्यांनतर जमलेल्या महिलांनी फेर धरून भोंडल्याची गाणी म्हणली. पुणे महानगराच्या विविध भागातून 800 महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
Maha Bhondla for women in Pune
महत्वाच्या बातम्या
- Baba Siddiqui : मुंबईत राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या; 2 आरोपींना अटक, लॉरेन्स टोळीचा हात असल्याचा संशय
- Baba Siddiqui : NCP अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत हत्या; फेब्रुवारीत कॉंग्रेस सोडून NCPमध्ये केला होता प्रवेश
- Eknath shinde : होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली तुमची महाविकास आघाडी; दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंची फटकेबाजी!!
- Reserve Bank of India : देशाच्या परकीय चलन गंगाजळीत 8 आठवड्यांत पहिल्यांदाच घट; 701 अब्ज डॉलरवर, गत आठवड्यात विक्रमी उच्चांक