प्रतिनिधी
मुंबई : अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने हिची आई स्नेहलता दीक्षित यांचे वयाच्या 90 व्या वर्षी 12 मार्च रोजी निधन झाले. आज दुपारी 3 वाजता मुंबईतील वैकुंठ धाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. Madhuri Dixit’s mother passes away; Gulabgang song was sung with Madhuri
माधुरी आणि तिचे पती-डॉक्टर श्रीराम नेने यांनी सांगितल्या नुसार, स्नेहलता यांचे आज सकाळी त्यांच्या प्रियजनांच्या सहवासात निधन झाले. माधुरीने असे ट्विट केले आहे की, “आमची प्रिय आई, स्नेहलता दीक्षित यांचे आज सकाळी त्यांच्या प्रियजनांच्या सहवासात निधन झाले.”
स्नेहलता यांनी 2013 मध्ये गुलाब गँग या चित्रपटासाठी माधुरीसोबत कामही केले होते. IANS ला दिलेल्या मुलाखतीत, चित्रपट निर्माते अनुभव सिन्हा म्हणाले होते, “जेव्हा आम्ही चित्रपटातील गाणे गाण्यासाठी माधुरीशी संपर्क साधला, तेव्हा तिने आनंदाने तसे करण्यास होकार दिला. जेव्हा ती रेकॉर्डिंगसाठी आली तेव्हा ती तिच्या आईला घेऊन अली. आणि आम्हाला कळले की तिची आई खूप चांगली गायिका आहे. म्हणून आम्ही तिच्या आईला विचारले. की त्या या चित्रपटसाठी गाणे गाऊ शकते का? आमच्या आग्रह खातर त्या दोघीही चित्रपटाची गाणी गायल्या.
जून 2022 मध्ये, माधुरीने तिच्या वाढदिवशी तिच्या आईसाठी एक ट्विट केले होते. तिने तिच्या आईचा एक फोटो पोस्ट करत लिहिले, “वाढदिवसाच्या शुभेच्छा, आई! असं म्हणतात की आई ही मुलीची सर्वात चांगली मैत्रीण असते. तसे अगदीच खरे आहे असे म्हणता येणार नाही.कारण तू माझ्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीतून, तू शिकवलेले धडे ही तुझ्याकडून माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे. तुला चांगले आरोग्य आणि आनंद मिळो अशी प्रार्थना करते.”
आई सोबतची निखळ मैत्री माधुरीने आपल्या चाहत्यांना सांगितली होती. आईच्या जाण्याचे दुःख असले. तरीही आईने प्रत्येक पाऊली केलेला सपोर्ट ती कायमच लक्षात ठेवून आपल्या क्षेत्रात कार्यरत राहत असते.
Madhuri Dixit’s mother passes away; Gulabgang song was sung with Madhuri
महत्वाच्या बातम्या
- ब्रिटिश सरकारवर टीका केल्याने बीबीसीने क्रीडा तज्ज्ञाला काढून टाकले, भारताचा सवाल- ही कसली पत्रकारिता?
- वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : पुढील वर्षी पूर्ण होणार देहू-आळंदी ते पंढरपूर पालखी मार्ग, मार्ग चौपदरी होण्याची गडकरींची ग्वाही
- हैदराबादेत पोहोचले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आज CISF स्थापना दिन परेडमध्ये होणार सहभागी
- P.M.मोदींचे सानिया मिर्झाला पत्र, इतर खेळाडूंना मिळाले इन्स्पिरेशन!