अभिनेत्री मधुरा साटम नव्या भूमिकेत!
विशेष प्रतिनिधी
पुणे: अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम आणि अभिनेते तुषार दळवी मराठी व्यावसायिक रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत. विजय केंकरे दिग्दर्शित ‘आपण यांना पाहिलंत का?’ या नव्याकोऱ्या नाटकात मधुरा आणि तुषार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेत्री मधुरा साटम ही ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांची सून आहे. आतापर्यंत तिने ‘गोजिरी’, ‘हापूस’, ‘मी अमृता बोलतेय’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलं आहे. Madhura satam new drama
आपण यांना पाहिलंत का?’ या नव्या नाटकाची निर्मिती आदिती देवेंद्र राव, वैशाली धनेश पोतदार यांनी केली आहे. तसेच सुशील स्वामी यांनी या नाटकाचं लेखन केलं आहे. आपल्या सुखी संसाराला कोणाची दृष्ट लागू नये असं चाळीशीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या प्रत्येक जोडप्याला वाटतं. संसारात एकत्र आहोत म्हणजे सगळं शांत आणि निवांत. असं खरंच असतं का? या विषयावर हे नाटक भाष्य करणार आहे. परंतु, या जोडप्याच्या सुखी संसारात आणि आयुष्यात अचानकपणे एक वादळ येतं. या वादळाच्या येण्यानं त्या जोडप्याच्या नात्याचं, त्यांच्या संसाराचं काय होतं? याची नर्म विनोदी गोष्ट ‘आपण यांना पाहिलंत का?’ या नाटकाद्वारे प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
तुषार दळवी आणि मधुरा वेलणकर साटम यांच्यासह विक्रम गायकवाड, श्रुती पाटील यांच्या या नाटकात भूमिका आहेत. अजित परब यांनी नाटकाचं संगीत, शीतल तळपदे यांनी प्रकाश योजना, मंगल केंकरे यांनी वेशभूषा, संदेश बेंद्रे यांनी नेपथ्याची जबाबदारी सांभाळली आहे.
Madhura satam new drama
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये यदुवंशियांबाबत भाजप-आरजेडीमध्ये वादंग!
- म्यानमारमध्ये लष्कराने पुन्हा हवाई हल्ला केला, 5 हजार लोक मिझोरामला पळून आले; 2021च्या सत्तापालटापासून 30 हजार लोकांनी आश्रय घेतला
- बारामतीच्या दिवाळीचे कौतुक पुरे झाले, आता धनगर आरक्षणासाठी उद्या बारामती बंदची हाक
- अमिताभ बच्चन दिवाळखोर झाल्यावर सुब्रत रॉय यांनी दिला होता ‘सहारा’