• Download App
    Madhukar Pichad भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकर पिचड यांचे निधन:वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सलग 7 वेळा राहिले आमदार

    Madhukar Pichad : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकर पिचड यांचे निधन:वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सलग 7 वेळा राहिले आमदार

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Madhukar Pichad भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचे निधन झाले. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मागील दीड महिन्यांपासून नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

    मधुकर पिचड 1980 ते 2009 अकोले मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी 1995 ते 1999 या काळात महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्षनेते भूषविले होते. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून बीए आणि एलएलबीचे शिक्षण घेतले. मधुकर पिचड यांनी 1961मध्ये अमृत सागर दूध सहकारी संस्थेची तर 1993 मध्ये अगस्ती सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. Madhukar Pichad

    मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास

    पिचड यांचा जन्म 1 जून 1941 रोजी राजूर येथे झाला. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथून बीए एलएलबीचे शिक्षण घेतले. विद्यार्थी असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 1972 मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1972 सालीच ते पंचायत समिती अध्यक्ष झाले. त्यांनी 1980 पर्यंत अध्यक्ष म्हणून काम केले.

    काँग्रेसपासून, राष्ट्रवादी, भाजप असा राजकीय प्रवास

    मधुकर पिचड यांच्या राजकीय प्रवासाला काँग्रेसमधून सुरुवात झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापना झाल्यानंतर ते शरद पवार यांच्यासोबत होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती. त्यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघातून पुत्र वैभव पिचड यांना राष्ट्रवादीकडून निवडून आणले. मधुकर पिचड यांनी 2019 ला आपल्या मुलासह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी वैभव पिचड यांचा भाजपच्या तिकीटावर पराभव झाला. Madhukar Pichad

    विविध खात्यांची जबाबदारी पाडली पार

    मधुकर पिचड यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत आदिवासी विकास, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय कल्याण, प्रवास विकास, पशु, संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय अशा विविध खात्यांची जबाबदारी पार पाडली होती

    Madhukar Pichad passes away

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!