विशेष प्रतिनिधी
अमरावती : दिवाळी म्हटलं की फराळ आलाच, गोड-धोड आलं,एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी मिठाई भेट देण्याची परंपरा आहे.अमरावती येथील रघुवीर मिठाई प्रतिष्ठानने ११हजार रुपये किलोची सोन्याचा मुलामा असलेली सुवर्ण कलश मिठाई तयार केली आहे.Made for Diwali Golden urn sweets
अमरावतीतील बडनेरा रोडवर असलेल्या रघुवीर प्रतिष्ठानने चक्क शुद्ध २४ कॅरेट सोन्याचा मुलामा देत ड्रायफूटच्या माध्यमातून ही सुवर्ण कलश मिठाई पाहण्यासाठी गर्दीत होत आहे, ग्राहकांना मिठाई सोबत २४ कॅरेट सोन्याचे प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येत आहे, अकरा हजार रुपये किलो असलेली ही मिठाई महागाईतही ग्राहक खरेदी करत आहेत.
काही ग्राहकांनुसार सुवर्ण प्राश म्हणजे सोनं हे शरीरासाठी व आरोग्यासाठी उत्तम आहे. मिठाईमुळे थोडे का होईना सुवर्ण पोटात जाते. त्यामुळे आम्ही मिठाई विकत घेतलेली आहे, असे ग्राहक सांगत आहेत.
- दिवाळीसाठी बनवली खास सुवर्ण कलश मिठाई
- एक किलोसाठी तब्बल ११हजार रुपये
- शुद्ध २४ कॅरेट सोन्याचा मुलामा असलेली मिठाई
- सुवर्ण कलश मिठाई पाहण्यासाठी गर्दी
- ग्राहकांना मिठाई सोबत २४ कॅरेट सोन्याचे प्रमाणपत्र
- सोने आरोग्यासाठी उत्तम असल्याने खरेदी