विशेष प्रतिनिधी
पुणे : शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘शिवसंकल्प अभियाना’तील पहिला मेळावा आज शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजगुरू नगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.Lying, breaking the alliance, Uddhav Thackeray on the chair of Chief Minister; Chief Minister Shinde on “Mission 48” campaign!!
दीड वर्षांपूर्वी मी घेतलेल्या निर्णयाला आपण सगळ्यांनी मिळून साथ दिलीत म्हणून इथवर वाटचाल करणे शक्य झाले आहे. त्यामुळे मला साथ देणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाचे आभार मानले. वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण अंगिकारून आपण ही वाटचाल करत असून सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी सारे मिळून झटत असल्याचे सांगितले.
*उद्धव ठाकरे यांनी खोटं बोलून शिवसेना – भाजप युती तोडली. सत्ता मिळाली तेव्हा स्वतः टूणकन उडी मारून मुख्यमंत्री झाले. मला कोणत्याही पदाचा मोह नसून पक्ष वाचवण्यासाठी मी वेगळी भूमिका घेतली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या कार्यकाळात देश नव्या उंचीवर जाऊन पोहोचला. ५०-६० वर्षात देशभरात जेवढे काम झाले नाही ते त्यांनी ९ वर्षांच्या कार्यकाळात करून दाखवले. त्यामुळे निवडणुकीच्या काळात कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सध्याच्या सकारात्मक वातावरणाचा फायदा घेऊन मोदीजींचे हात बळकट करा. येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणून “मिशन 48” यशस्वी करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना केले.
यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी मंत्री विजयबापू शिवतारे, माजी आमदार शरद सोनवणे, सचिव संजय म्हशीलकर, शिवसेनेच्या महिला नेत्या मीनाताई कांबळी, प्रवक्त्या सौ. ज्योती वाघमारे, सौ. शितल म्हात्रे तसेच पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
Lying, breaking the alliance, Uddhav Thackeray on the chair of Chief Minister; Chief Minister Shinde on “Mission 48” campaign!!
महत्वाच्या बातम्या
- शासन आपल्या दारी कार्यक्रमातून रायगड जिल्ह्यात 26 लाख लाभार्थ्यांना 1700 कोटींचे लाभ!!
- पाकिस्तानात लोकशाहीची पुन्हा हत्या, नॅशनल असेंब्लीची निवडणूक बेमुदत पुढे ढकलली; लष्करी राजवटीचा धोका वाढला!!
- सोमालियाजवळ ‘लीला’ जहाजाचे अपहरण, जहाजावर 15 भारतीय क्रू मेंबर्स!
- महाराष्ट्रात येत्या 15 दिवसांत आणखी भूकंप; राष्ट्रवादीत खळबळ, सगळ्या विरोधी पक्षाची स्पेस काँग्रेससाठी मोकळी??