• Download App
    मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातले वातावरण "गरम"; पण मतदार "थंड"!!, मतदानात खालून पहिला!! Lowest response from voters in Maharashtra

    मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातले वातावरण “गरम”; पण मतदार “थंड”!!, मतदानात खालून पहिला!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात आज 7 मे 2024 रोजी बारामती, माढा, सोलापूर सारख्या अतिप्रतिष्ठेच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत असल्याने वातावरण प्रचंड “गरम” झाले असले, तरी प्रत्यक्षात मतदार मात्र “थंड” पडून राहिला आहे. कारण संपूर्ण देशात महाराष्ट्रातल्या मतदाराने सर्वांत कमी प्रतिसाद दिला आहे. Lowest response from voters in Maharashtra

    एरवी महाराष्ट्र पुरोगामी बडबड करण्यात पुढे असतो. देशाला महाराष्ट्र दिशा देतो, असे ज्ञान वाटण्यात महाराष्ट्रातले नेते पुढे असतात, पण प्रत्यक्षात घरातून बाहेर पडून मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यात मात्र महाराष्ट्र मागे राहिल्याची गेल्या कित्येक वर्षांची उदाहरणे आहेत. ते उदाहरण याही वर्षी कायम राहिले. मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यात महाराष्ट्र देशात सर्वांत मागेच पडला होता. तेच रेकॉर्ड महाराष्ट्राने तिसऱ्या टप्प्यातही कायम ठेवले.

    दुपारी 1.00 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 31.55 % मतदानाची नोंद झाली आहे. बारामती मतदारसंघात सगळ्यात कमी मतदानाची नोंद झाली आहे.

    * लातूर – 32.71%
    * सांगली – 29.65%
    * बारामती – 27.55%
    * हातकणंगले – 36.17%
    * कोल्हापूर – 38.42%
    * माढा – 26.61%
    * धाराशीव – 30.54%
    * रायगड – 31.34%
    * रत्नागिरी- सिंधुदुर्ग – 33.91%
    * सातारा – 32.78%
    * सोलापूर – 29.32%

    – देशात एकूण 39.92 % मतदानाची नोंद असून, महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे आहे.

    * आसाम – 45.88%
    * बिहार – 36.69%
    * छत्तीसगड – 46.14%
    * दादरा नगर हवेली आणि दमण दीव – 39.94%
    * गोवा – 49.04%
    * गुजरात – 37.83%
    * कर्नाटक – 41.59%
    * मध्य प्रदेश – 44.67%
    * महाराष्ट्र – 31.55%
    * उत्तर प्रदेश – 38.12%
    – पश्चिम बंगाल- 40 27%

    Lowest response from voters in Maharashtra

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस