विशेष प्रतिनिधी
Amit Thackeray माहीम विधानसभा मतदारसंघ आणि अमित ठाकरे यांच्या उमेदवारीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेटच गौप्यस्फोट केला आहे. अमित ठाकरे जिंकण्याची शक्यता कमी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.Amit Thackeray
मुख्यमंत्री म्हणाले, राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार त्यांचे चिरंजीव हे भांडूप विधानसभा मतदारसंघातून लढतील, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे आम्ही आमची आखणी तशी केली होती. मात्र, नंतर त्यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली, असे शिंदे यांनी म्हटले आहे. तिथे आमचे सदा सरवणकर उमेदवार आहेत. स्थानिक समिकरणे विचारात घेतल्यास आणि थेट लढत झाल्यास अमित जिंकण्याची शक्यता कमी आहे, असे सरवणकर यांचे म्हणने होते. ते म्हणणे सांगण्यासाठी गेलेल्या सरवणकर यांची भेटही राज यांनी नाकारली.
माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. विद्यमान आमदार सदा सरवणकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून मैदानात आहेत. तर त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उबाठा) गटाकडून महेश सावंत रिंगणात आहेत. त्यातच आता राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अशा वेळी काट्याची टक्कर होणार हे निश्चित आहे. पण, राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला असताना तिथे शिंदे यांचा उमेदवार उभा राहणे हे काहीसे राजकीय दृष्ट्या चर्चात्मक ठरले आहे. ज्यामध्ये त्यांनी अमित ठाकरे यांच्या उमेदवारीबाबत गौप्यस्फोट केले आहेत.
आम्ही अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले नाहीत. उदा. शिवडी विधानसभा मतदारसंघात मनसेचे बाळा नांदगावकर उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार नाही. अमित ठाकरे यांच्याबद्दलही मतदारसंघ सांगताना आम्हाला तो भांडूप असल्याचे सांगितले होते. आम्ही सर्व आखणी त्यादृष्टीने केले. पण, त्यांची उमेदवारी थेट जाहीर झाली ती सुद्धा माहीम येथून. तेथे काही स्थानिक समिकरणे आहेत. जी पाहता महेश सावंत आणि अमित ठाकरे यांच्यात थेट लढत झाली तर त्यांच्या जिंकण्याची शक्यता कमी आहे, असे सदा सरवणकर यांचे म्हणने होते. त्याउलट तिरंगी लढत झाली तर आम्हा दोघांपैकी एकाची जिंकण्याची शक्यता अधिक आहे, असे त्यांना वाटत होते. मी हाच विचार जाऊन राज ठाकरे यांना सांगण्यास सांगितले. पण, त्यांनी भेटच टाळली, असे शिंदे यांनी म्हटले आहे.
भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा मध्यमवर्गीय आणि कष्टकरी वर्गाचे वर्चस्व असलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. येत्या निवडणुकीत शिवसेना आणि मनसे यांच्यातील संभाव्य लढतीमुळे हा मतदारसंघ चर्चेत आहे.
मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघाचा एक भाग म्हणून भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते. मुंबईतील कोकणी माणसांचा मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे. या मतदारसंघात मध्यमवर्गीय, कष्टकरी समाजाचे वर्चस्व आहे. भांडुप पश्चिम या मतदारसंघात आतापर्यंत कोणत्याही पक्षाची मक्तेदारी राहिलेली नाही. शिवसेनेचे रमेश कोरगावकर हे सध्या या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. वाहतूक कोंडी, पिण्याची पाण्याची समस्या, मलनिस्सारणाची व्यवस्था हे मुद्दे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी गाजताना दिसत आहेत. त्यामुळे यंदा या मतदारसंघात कोण बाजीया मतदारसंघात ७० टक्के मराठी भाषिक लोकांचे वास्तव्य आहे. त्यासोबतच भांडुपमध्ये उत्तर भारतीय, दाक्षिणात्य, मुस्लीम, गुजराती आणि शीख असे सर्वधर्मीय लोक या ठिकाणी राहतात. हा मतदारसंघ केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक घडामोडींचे केंद्र म्हणून ओळखले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून भांडुप विधानसभा मतदारसंघात पायाभूत सुविधांचा मात्र अभाव पाहायला मिळतो.
भांडुप विधानसभा मतदारसंघांची स्थापना झाल्याच्या पहिल्याच वर्षी 1978 मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने बाजी मारली. त्यानंतर 1980 आणि 1985 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने संपूर्ण ताकद लावत या मतदारसंघात आपली सत्ता स्थापन केली. त्यानंतर 1990, 1995 आणि 1999 अशी सलग तीन वर्षे शिवसेनेच्या लिलाधर डाके यांनी विजय मिळवत हा मतदारसंघ काबीज केला. यानंतर 2004 मध्ये राष्ट्रवादीने या मतदारसंघातून संजय दीना पाटील हे आमदार म्हणून विजयी झाले.
यानंतर 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या शिशिर शिंदेंनी मोठी बाजी मारली. यानंतर 2014 आणि 2019 या दोन्हीही विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा ताकद लावत हा मतदारसंघ काबीज केला. सध्या रमेश कोरगावकर हे भांडुप विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. रमेश कोरगावकर हे कट्टर शिवसैनिक असल्याने शिवसेनेत बंड झाल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंसोबतच राहणे पसंत केले.
भांडुप मतदारसंघात अनेक पायाभूत सुविधांचा अभाव आहे. भांडुपमधील अनेक रस्ते हे अरुंद आहेत. यामुळे बहुतांश वेळा या भागात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. तर दुसरीकडे भांडुपमध्ये एकही शासकीय रुग्णालय नाही. तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण, मनोरंजनासाठी नाट्यगृह, सांस्कृतिक केंद्राचीही सुविधाही इथे उपलब्ध नाही. भांडुपमध्ये नाले रुंदीकरणचा प्रकल्पही अद्याप कागदावर आहे.
येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकासआघाडीकडून शिवसेनेचे रमेश कोरगावकर हे पुन्हा भांडुपमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
“Low Chances of Amit Thackeray’s Victory: What Did the Chief Minister Reveal?”
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis व्होट जिहादविरोधात एकत्रित मतदान करण्याची गरज, विरोधकांची स्ट्रॅटेजी ओळखा; देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक भाषण
- Sunil Tatkare राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 नेत्यांचे पक्षातून निलंबन; प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची कारवाई
- Between the lines : अजितदादा सत्तेची वळचण सोडणार नसल्याचा पवारांचा खुलासा; दिला ईडी + सीबीआयचा हवाला!!
- Kirit Somayya : ‘व्होट जिहाद’वरून राजकारण तापले; किरीट सोमय्या यांनी केली ‘ही’ मागणी