• Download App
    रोहित पवारांच्या कर्जत जामखेड मतदार संघात लव्ह जिहाद; मुलाचा मामा सैय्यद शहाबुद्दीन शेखसह साथीदार भांगेला अटक|Love Jihad in Rohit Pawar's Karjat Jamkhed Constituency

    रोहित पवारांच्या कर्जत जामखेड मतदार संघात लव्ह जिहाद; मुलाचा मामा सैय्यद शहाबुद्दीन शेखसह साथीदार भांगेला अटक

    प्रतिनिधी

    नगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदार संघात लव्ह जिहादचा प्रकार समोर आला आहे. त्या प्रकरणात अडकलेल्या मुलीच्या आई वडील आणि भावाने आमरण उपोषण सुरू केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.Love Jihad in Rohit Pawar’s Karjat Jamkhed Constituency

    कर्जत – जामखेड लव्ह जिहाद प्रकरणात पोलिसांनी मुलाचा मामा सैय्यद शहाबुद्दीन शेख आणि या सैय्यदच्या शेता शेजारी शेत असलेला गोकुळ भांगे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.



    या दोघांनी मुलीला आणि मुलाला पळून जाण्यास मदत केली आहे. सैय्यद शेखच्या घरी मुलगा आणि मुलगी थांबले होते. हे सर्व FIR मध्ये नमूद केले आहे.

    संबंधित लव्ह जिहाद घटना 23 मे 2023 तारखेची आहे. मुलीचे वडील 25 मे रोजी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. आता त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

    पोलिसांनी शोध घेण्यासाठी पथके तयार केली आहेत. ज्या लोकांनी पळून जाण्यास मदत केली आहे. त्या सर्वांना चौकशी नंतर अटक करण्यात येत आहे.

    संबंधित मुलाने मुलीला घेऊन एक वर्षे आधी देखील पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मुलीचा साखरपुढा झाला होता. पण तो मोडला. मुलगी अल्पवयीन आहे. पोलीस या प्रकरणात पुढचा तपास करत आहेत.

    Love Jihad in Rohit Pawar’s Karjat Jamkhed Constituency

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    नागपूरच्या ईश्वरी पांडेने पार केली पाल्कची समुद्रधुनी; जिद्द, धैर्य आणि अदम्य इच्छाशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण!!; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा