• Download App
    महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यांवरून पुन्हा अजान, आंदोलनावरून प्रवीण तोगडियांचा राज ठाकरेंना सवाल आणि आवाहन loudspeakers on masques, praveen togadia asks raj thackeray to start again his agitation

    महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यांवरून पुन्हा अजान, आंदोलनावरून प्रवीण तोगडियांचा राज ठाकरेंना सवाल आणि आवाहन

    विशेष प्रतिनिधी

    बुलढाणा : २०२२ मध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मशिदींच्या भोंग्यांविरोधात जोरदार आंदोलन करून ते भोंगे बंद पाडून दिखविले होते. पण त्या आंदोलनाचा जोर महाराष्ट्रात नवे सरकार बसल्यानंतर ओसरला. मशिंदींवर पुन्हा भोंगे चढले आणि आता या भोंग्यांवरून जोरजोरात अजान सुरू झाल्या आहेत. लोकांना त्याचा त्रास होतो आहे. अनेकांनी पोलीसांत तक्रारी दाखल केल्या आहेत.

    या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी राज ठाकरे यांना आंदोलनाबाबत प्रश्न विचारला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात भोंग्याविरुद्ध रस्त्यावर उतरलात. पण आता शिंदे – फडणवीसांच्या सरकारच्या काळातही भोंग्यांवरून आजान सुरू आहेत, तेव्हा आपण आंदोलन कधी करणार, असा सवाल तोगडिया यांनी राज ठाकरे यांना केला आहे.



    अजान आणि भोंगे यांच्याबद्दल राज ठाकरेंना विचारा काय झालं ते…? आता त्यांच्या मित्रांचं सरकार आलं आहे, त्यांना विचारा की कधी आंदोलन करून भोंग्यांवरच्या अजान कधी बंद करणार आहात, आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काळात त्यांनी आंदोलन केले तर मी त्यांच्या सोबत राहीन, असे आश्वासनही प्रवीण तोगडिया यांनी दिले आहे.

    -औरंगजेबप्रमेमींना कानपिचक्या

    यावेळी त्यांनी औरंगजेबाच्या मुद्द्यावरूनही महाराष्ट्रातील राजकारण्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. महाराष्ट्रात औरंगजेबावर प्रेम करणारे छूट भैया अनेक आहेत. त्यांनी औरंगजेबाच्या जन्मगावी जावे. मुस्लिम लोकसंख्या वाढू नये यासाठी कायदा बनवावा. हिंदूंनी तर लोकसंख्येवर नियंत्रण केले आहे, याची आठवण तोगडियांनी करवून दिली.

    loudspeakers on masques, praveen togadia asks raj thackeray to start again his agitation

    हत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस